• Download App
    भारतात प्रवास करणे कमी धोक्याचे, अमेरिकेचे स्पष्टीकरण|Travelling in India is safe says USA

    भारतात प्रवास करणे कमी धोक्याचे, अमेरिकेचे स्पष्टीकरण

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन – भारतात जाऊ इच्छिणाऱ्या अमेरिकी नागरिकांना येथील सरकारने दिलासा दिला असून भारतात संसर्गाचा धोका कमी असल्याचे सांगणारा ‘लेव्हल-१’ कोविड इशारा सरकारने जारी केला आहे.Travelling in India is safe says USA

    भारतात संसर्गाचा धोका कमी झाला असून लसीकरण पूर्ण झाले असल्यास बाधित होण्याची शक्यता अत्यल्प आहे, असे याद्वारे सूचित करण्यात आले आहे. भारतातील कोरोना संसर्गस्थितीत सुधारणा झाल्याने सरकारने सुधारित सूचना जारी केल्या आहेत.



    मात्र, भारतात प्रवास करताना हिंसाचार आणि दहशतवादाच्या घटनांमुळे जम्मू-काश्मीतरसह भारत-पाकिस्तानच्या सीमाभागात जाणे टाळावे, असा सल्लाही पर्यटकांना देण्यात आला आहे. पाकिस्तानमध्ये जाण्याचा मात्र अमेरिकी नागरिकांनी फेरविचार करावा, आणि गेल्यास बलुचिस्तान भागात जाणे टाळावे, अशी सूचना करण्यात आली आहे.

    Travelling in India is safe says USA

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या