नाशिक : भारताबरोबर टेरिफ युद्ध मांडलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या CEO गाला डिनर पार्टीत भारतीय कम्युनिस्ट दिग्गज नेत्याचा बडा भांडवलदार पुतण्या सामील झाला होता, पण त्याकडे भारतीय माध्यमांचे किंवा जागतिक माध्यमांचे नेमकेपणाने लक्ष गेले नाही. Donald Trump
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबरोबर टेरिफ युद्ध मांडल्यानंतर जागतिक पातळीवरच्या राजकारणात ते एकाकी पडले. कारण भारत, चीन आणि रशिया एकत्र आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ज्यादा टेरिफचा भारतावर फारसा दुष्परिणाम झाला नाही. जो दुष्परिणाम झाला तो सहन करायची ताकद भारताने निर्माण केली. पण भारताने आपले आर्थिक आत्मनिर्भरतेचे धोरण बदलले नाही.
या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतल्या तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या CEO ना व्हाईट हाऊस मध्ये गाला डिनर पार्टी दिली. त्यामध्ये त्यांना अमेरिकेत गुंतवणूक करण्याचे आणि उत्पादन करण्याचे आवाहन केले तुम्ही अमेरिकेत किती गुंतवणूक करणार अशी थेट विचारण्यात यांनी ॲपलच्या सीईओंना केली. त्यांनी 600 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करायची तयारी दाखविली.
ट्रम्प यांच्या गाला डिनर पार्टीत भारतीय वंशाचे 5 CEO हजर राहिले. त्यामध्ये संजय मेहता (मायक्रोन) श्याम शंकर (पलांतीर), विवेक रणदिवे (टिबॅको), सत्या नाडेला (मायक्रोसॉफ्ट) आणि सुंदर पिचाई (गुगल) यांचा समावेश होता. पण यापैकी एक जण भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या दिग्गज नेत्याचा बडा भांडवलदार पुतण्या होता, हे मात्र फारसे कुणाच्या लक्षात आले नाही.
– बी. टी. रणदिवे यांचे पुतणे ट्रम्पच्या पार्टीत हजर
विवेक रणदिवे हे त्यांचे नाव. विवेक रणदिवे हे भारतामध्ये कम्युनिस्ट चळवळ रुजविणारे दिग्गज नेते बी. टी. रणदिवे यांचे पुतणे आहेत. विवेक यशवंत रणदिवे हे त्यांचे पूर्ण नाव. त्याचबरोबर ते अहिल्या रांगणेकर या कम्युनिस्ट खासदारांचे भाचे देखील आहेत. परंतु मुंबईमध्ये शिक्षण झाल्यानंतर विवेक रणदिवे यांनी आपल्या काकांप्रमाणे आणि आत्याप्रमाणे कम्युनिस्ट चळवळीची वाट न धरता अमेरिकेची वाट धरली आणि तिथेच वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून ते बडे भांडवलदार बनले.
अमेरिकेत त्यांनी 1985 पासून ते आत्तापर्यंत तीन मोठ्या कंपन्या स्थापन करून ते त्यांचे मालक बनले. त्यामध्ये टेक्नेक्रॉन सॉफ्टवेअर सिस्टीम, टिबको आणि बो कॅपिटल यांचा समावेश राहिला. तिन्ही कंपन्या विवेक रणदिवे यांनी अमेरिकेत राहून वाढविल्या आणि त्यांचे जाळे जगभर पसरविले. अमेरिकेतच त्यांनी डोबेरो एडिकोट यांच्याशी विवाह केला. त्यांच्यापासून त्यांना तीन अपत्ये झाली. विवेक रणदिवे तसेच त्यांची कुठलीही मुले कम्युनिस्ट चळवळीकडे ओढली गेली नाहीत. हेच विवेक रणदिवे काल डोनाल्ड ट्रम्प यांनी आयोजित केलेल्या बड्या कंपन्यांच्या CEO गाला डिनर पार्टीला व्हाईट हाऊस मध्ये हजर होते.
The tycoon nephew of a legendary Indian communist leader attends Donald Trump’s CEO Gala Dinner Party!!
महत्वाच्या बातम्या
- GST सुधारणांना उशीर झाल्याबद्दल काँग्रेसने केली टीका; पंतप्रधान मोदींनी expose केली काँग्रेसच्या राजवटीतील GST भाराची भूमिका!!
- Karnataka : कर्नाटकातील काँग्रेस आमदाराने सट्टेबाजीतून कमावले 2000 कोटी; व्हीआयपी सिरीजच्या 5 मर्सिडीज बेंझ जप्त
- Russia : रशिया भारताला अधिक S-400 संरक्षण प्रणाली देणार; रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले- सहकार्य वाढत आहे
- Manipur : मणिपूर-नागालँड राष्ट्रीय महामार्ग पुन्हा खुला होणार; हिंसाचारानंतर दोन वर्षांपासून बंद होता मार्ग