• Download App
    ICC ने कोहलीने T२० चे कर्णधारपद सोडल्यानंतर असा केला सन्मान ; ' हा ' होणार नवीन कर्णधार|ICC ने कोहलीने T२० चे कर्णधारपद सोडल्यानंतर असा केला सन्मान ; ' हा ' होणार नवीन कर्णधारThe ICC honored Kohli after he resigned as T२० captain; This will be the new captain

    ICC ने कोहलीने T२० चे कर्णधारपद सोडल्यानंतर असा केला सन्मान ; ‘ हा ‘ होणार नवीन कर्णधार

    विराट कोहली याने टी-२० विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडणार असल्याचे आधीच जाहीर केले होते.The ICC honored Kohli after he resigned as T२० captain; This will be the new captain


    विशेष प्रतिनिधी

    दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आपल्या ट्विटर अकाऊंटच्या कव्हर पेजवर विराट कोहलीचा T२० कर्णधार म्हणून शेवटच्या सामन्याचा फोटो टाकला आहे. आयसीसीने विराट कोहलीला आदर देण्यासाठी हे केले आहे, जे पाहून भारतीय चाहत्यांनाही अभिमान वाटेल. विराट कोहली याने टी-२० विश्वचषकानंतर टी-२० फॉरमॅटचे कर्णधारपद सोडणार असल्याचे आधीच जाहीर केले होते.

    रोहित शर्मा होणार नव्या संघाचा कर्णधार

    विराट कोहलीने कर्णधार पदासाठी रोहितच्या नावाचे संकेत दिले आहेत. विराट म्हणाला, ‘संघ ज्या प्रकारे खेळला त्याचा मला खूप अभिमान आहे. आता या संघाला पुढे नेण्याची जबाबदारी इतरांवर देण्याची वेळ आली आहे, असे मला वाटते. साहजिकच रोहित इथे आहे आणि तो काही काळापासून गोष्टींचा शोध घेत आहे. त्यावरून आता रोहित या संघाचा नवा कर्णधार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.



    कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली म्हणाला, ‘माझ्यासाठी (संघाचे नेतृत्व करणे) हा सन्मान आहे, मला संधी देण्यात आली आणि मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. गेल्या ६ ते ७ वर्षात मी जेव्हा जेव्हा मैदानात उतरलो तेव्हा मी चांगलं क्रिकेट खेळलो, ज्याचा शरीरावर खूप परिणाम होतो.

    सोमवारी भारताचा शेवटचा सामना नामिबियाविरुद्ध होता.ज्यामध्ये भारताने ९ विकेट्सने विजय मिळवला. हा सामना विराट कोहलीच्या T२० कर्णधारपदातील शेवटचा सामना होता. विराट कोहलीने T-२० फॉरमॅटमध्ये भारताचे कर्णधारपद सोडले आहे.

    The ICC honored Kohli after he resigned as T२० captain; This will be the new captain

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या