• Download App
    ऑस्ट्रेलियात या वर्षातील पहिलाच कोरोना बळी, ७७ जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव|The first corona victim in Australia this year, 77 corona outbreaks

    ऑस्ट्रेलियात या वर्षातील पहिलाच कोरोना बळी, ७७ जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव

    विशेष प्रतिनिधी

    मेलबर्न : ऑस्ट्रेलियात रविवारी पहिल्यांदा झालेल्या या वर्षातील कोरोनाच्या पहिल्या बळीची नोंद झाली आहे. न्यू साउथ वेल्स या राज्यात ७७ जणांना डेल्टा विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे.The first corona victim in Australia this year, 77 corona outbreaks

    देशातील सर्वात मोठे शहर सिडनी येथे कोेरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे कडक लॉकडाऊनची गरज निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत संक्रमणाचे प्रमाण वाढणार असल्याची भीती स्टेट प्रीमियर ग्लेडिस बेरेजिक्लियन यांनी व्यक्त केली आहे. शनिवारी नवीन ५० नवीन रुग्ण सापडले. एकूण सक्रीय रुग्णांची संख्या ५६६ वर पोहोचलीआहे.



    रविवारी सापडलेल्या कोरोना बाधितांमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर धास्तीचे वातावरण आहे. याचे कारण म्हणजे नव्याने सापडलेल्या कोरोना बाधितांपैकी ३३ जण हे समाजात मिसळत होते. त्यामुळे त्यांच्याकडून अनेक जणांना बाधा झाली असण्याची भीती आहे. त्यामुळे सिडनी आणि परिसरातील ५० लाखांहून अधिक लोकांना धोका होण्याची भीती आहे. त्यामुळे सिडनीमध्ये तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.

    व्हिक्टोरिया या राज्यात गेल्या अकरा दिवसांपासून नवीन रुग्ण सापडला नाही. त्यामुळे व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी या राज्याने न्यू साउथ वेल्स आणि सिडनीशी असलेल्या सीमा बंद करीत असल्याचे सांगितले. सिडनीमध्ये रूग्णालयात 52 रुग्ण आहेत. मात्र, शहरातील दहापैकी किमान एक जण कोरोना बाधित आहे. यंदाच्या वर्षातील पहिला मृत्यू एका ९० वर्षीय महिलेचा झालेला आहे.

    कोरोनाच्या साथीत जगातील इतर देशांपेक्षा ऑस्ट्रेलियातील उद्रेक कमी होता. आत्तापर्यंत केवळ ३१ हजार जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला अहे. ९११ जणांचा मृत्यू झालेला आहे. मात्र, लसीचा पुरेसा पुरवठा नसल्याने लसीकरण मोहीम थंडावलेली आहे. सध्या फक्त 40 वर्षांवरील लोकांसाठी आणि ज्यांना कामाच्या ठिकाणी व्हायरसच्या संपर्कात येण्याची जोखीम असलेल्यांसाठीच उपलब्ध आहे.

    The first corona victim in Australia this year, 77 corona outbreaks

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या