वृत्तसंस्था
काबूल : Taliban पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव वाढतच आहे. शुक्रवारी चर्चेचा एक नवीन टप्पा सुरू होताच, पाक-अफगाण सीमेवरील चमन सीमेवर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पाकिस्तानी सुरक्षा सूत्रांनी धक्कादायक दावा केला आहे की अफगाण तालिबानने पाकिस्तानविरुद्ध ६०० हून अधिक आत्मघाती बॉम्बरना प्रशिक्षण दिले आहे. हे बॉम्बर काबुल विद्यापीठ आणि इतर शैक्षणिक संस्थांमधून भरती केले जात आहेत. या तरुणांमध्ये मोठ्या संख्येने उच्चशिक्षित विद्यार्थी आहेत ज्यांना पाकिस्तानमधील लष्करी आणि सामरिक लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे.Taliban
२०२१ मध्ये तालिबान सत्तेत आल्यानंतर, पाकिस्तानने अफगाण सीमावर्ती भागात दहशतवाद्यांवर कारवाई तीव्र केली. परिस्थिती आता बिकट होत आहे. वाढता सीमा संघर्ष, टीटीपीला (तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान) अफगाणिस्तानात आश्रय मिळणे, अफगाण निर्वासितांचे परतणे आणि ड्युरंड रेषेवरील हल्ले या सर्वांमुळे तणाव वाढला आहे. पाकिस्तानी एजन्सींनुसार, अटक केलेल्या दहशतवादी नैमतुल्लाहने चौकशीदरम्यान कबूल केले की त्याला कंदहारहून आणले होते आणि पाकिस्तानमध्ये हल्ल्यांसाठी प्रशिक्षण दिले होते. काही तालिबानी गट विद्यापीठ कॅम्पसमधील धार्मिक गट आणि अभ्यास मंडळांद्वारे विद्यार्थ्यांना कट्टरपंथी बनवत आहेत.Taliban
पाकच्या अणु तळावर भारत-इस्रायल हल्ल्याच्या प्लॅनला इंदिरांची मंजुरी नव्हती
न्यूयॉर्क | माजी सीआयए अधिकारी रिचर्ड बार्लो यांनी खुलासा केला आहे की भारत आणि इस्रायलने १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या कहुटा अणुऊर्जा प्रकल्पावर संयुक्त गुप्त हल्ला करण्याची योजना आखली होती. ही योजना पाकिस्तानच्या अणु महत्त्वाकांक्षांना रोखण्यासाठी होती, परंतु तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्याला मान्यता दिली नाही. बार्लो यांनी याला “लज्जास्पद निर्णय” म्हटले.
पीओकेमध्ये जेन-झींचे बंड; पाकचे ५ हजार सैन्य दाखल
पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये जेन-झींचे आंदोलन तीव्र झाले आहे. आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांचे गट रस्त्यावर उतरले आहेत. सूत्रांनुसार पाकिस्तानच्या शाहबाज सरकारने शुक्रवारी इस्लामाबादहून ५,००० सैनिकांना विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी पाठवले आहे. तसेच, मीरपूर, मुझफ्फराबाद, रावलकोटसह सहा विद्यापीठांतील विद्यार्थी संघटनांना निलंबित करण्यात आले आहे. पीओकेमधील विद्यापीठांचे विद्यार्थी परीक्षांत पारदर्शकता व फी वाढीविरुद्ध आंदोलन करत आहेत. यात आठवड्यात विद्यार्थ्यांसह ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
Taliban Trains 600 Suicide Bombers Pakistan Attack Kabul University |
महत्वाच्या बातम्या
- पार्थ पवारांचा वादग्रस्त जमीन व्यवहार रद्द; अजित पवारांची पत्रकारांना माहिती; की नवा राजकीय डाव??
- Pakistan : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हल्ला; नागरिकांना केले लक्ष्य; तालिबानचेही प्रत्युत्तर
- Raina Dhawan : रैना आणि धवनची 11.14 कोटींची मालमत्ता जप्त; बेटिंग अॅप प्रकरणात ईडीची कारवाई; युवराज आणि सोनू सूद यांचीही चौकशी
- पार्थ पवार कोरेगाव पार्क मधली जमीन शासनाला परत करणार??, की राजकीय वाद + कायद्याच्या कचाट्यातून मान सोडवून घेण्यासाठी नवा डाव??