• Download App
    तालीबानला हवेत भारताशी चांगले संबंध, काश्मीरबाबतही हस्तक्षेप करणार नाही, तालीबानी नेता अनस हक्कानी याने केले स्पष्ट|Taliban leader Anas Haqqani has said that the Taliban will not interfere in Kashmir, even if it has good relations with India.

    तालीबानला हवेत भारताशी चांगले संबंध, काश्मीरबाबतही हस्तक्षेप करणार नाही, तालीबानी नेता अनस हक्कानी याने केले स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी

    काबूल : आम्हाला भारताशी चांगले संबंध हवे आहेत. आमच्याबद्दल कुणीही चुकीचा विचार करू नये, अशी आमची इच्छा आहे. भारताने 20 वर्षं आपल्या शत्रूला मदत केली, पण आम्ही सर्व काही विसरून संबंध पुढे नेण्यास तयार आहोत, असे वक्तव्य तालीबान नेता अनस हक्कानी यांनी केले आहे. काश्मीरबाबतही आम्ही हस्तक्षेप करणार नाही असे त्यांनी सांगितले.Taliban leader Anas Haqqani has said that the Taliban will not interfere in Kashmir, even if it has good relations with India.

    तालिबानचे नेते अनस हक्कानी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना भारतासंदर्भातील भूमिकेवर प्रथमच भाष्य केले. हक्कानी म्हणाले की, काश्मीर आमच्या अधिकार क्षेत्राचा भाग नाही आणि या प्रकरणात हस्तक्षेप करणे धोरणाच्या विरोधात आहे. आम्ही आमच्या धोरणाच्या विरोधात कसे जाऊ शकतो?



    अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांबाबत हक्कानी म्हणाले, मी विश्वास देऊ इच्छितो, की सर्व जण अफगाणिस्तानात सुरक्षित आहेत. आम्हाला भारताशी चांगले संबंध हवे आहेत. आपल्याबद्दल कुणीही चुकीचा विचार करू नये, अशी आमची इच्छा आहे. भारताने 20 वर्षं आपल्या शत्रूला मदत केली, पण आम्ही सर्व काही विसरून संबंध पुढे नेण्यास तयार आहोत.

    अफगाणिस्तानमधील अपूर्णावस्थेत असलेल्या भारताच्या प्रकल्पांसंदर्भात तालिबानी नेता म्हणाला, आम्ही आगामी काही दिवसांतच सर्व धोरण स्पष्ट करू. आम्हाला अफगाणिस्तानच्या लोकांसाठी मदत हवी आहे. आम्हाला फक्त भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे समर्थन हवे आहे.

    काबूल गुरुद्वारावरील 2020 च्या हल्ल्यासंदर्भात अमेरिकेने हक्कानी नेटवर्कवर आरोप केले होते. ते आरोप फेटाळून लावत हक्कानी म्हणाले, हा फक्त शत्रू आणि माध्यमांनी केलेला प्रचार आहे. हे आरोप पूर्णपणे खोटे आहेत.

    गेल्या काही दिवसांत आलेल्या छायाचित्रांमध्ये तालिबान आणि वरिष्ठ हक्कानी नेते अनेक वेळा एकत्र दिसले. हक्कानी नेटवर्कचे वरिष्ठ नेते काबूलमध्ये आहेत. काबूल विमानतळाची सुरक्षा हक्कानी नेटवर्कच्या हातात आहे.

    Taliban leader Anas Haqqani has said that the Taliban will not interfere in Kashmir, even if it has good relations with India.

     

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या