• Download App
    भारताने अफगाणिस्तानमध्ये येऊ नये, तालिबानची धमकी; देशातील प्रकल्पांबाबत मात्र केले कौतुक|Taliban gave ultimatum to India

    भारताने अफगाणिस्तानमध्ये येऊ नये, तालिबानची धमकी; देशातील प्रकल्पांबाबत मात्र केले कौतुक

    विशेष प्रतिनिधी

    काबूल – भारताने अफगाणिस्तानला मदत करण्याचा प्रयत्न करु नये, जर अफगाणी सैन्याला मदत करण्याचा प्रयत्न केला तर ती त्यांच्यासाठी चांगली गोष्ट नाही,’’ अशी धमकी तालिबानचा प्रवक्ता मोहम्मद सोहेल शाहीन याने भारता दिली आहे. मात्र आमची भूमी इतर देशांविरोधात वापरु न देण्यासाठी आम्ही बांधील आहोत.Taliban gave ultimatum to India

    आमच्याकडून कोणत्याही दूतावास किंवा प्रतिनिधींना धोका नाही. आम्ही दूतावास आणि प्रतिनिधींवर हल्ला करत नाही, असेही त्याने स्पष्ट केले.‘एएनआय’ ने घेतलेल्या मुलाखतीस शाहीनने अनेक विषयांवर भाष्य केले. तो म्हणाला, ‘‘जर भारत अफगाणिस्तान सैन्याच्या मदतीला आला तर त्यांच्यासाठी हे चांगले ठरणार नाही.



    इतर देशांनी अफगाणिस्तानमध्ये सैन्य आणल्यानंतर त्यांची काय अवस्था झाली हे त्यांनी पाहिले असेल. हे सगळे सर्वांसमोर आहे.’’ अफगाणिस्तानची भूमी भारतविरोधी कारवायासाठी वापरली जाणार नाही याची काय खात्री आहे, असा सवाल शाहीन यांना करण्यात आला. यावर तो म्हणाला की, आमची भूमी इतर देशांविरोधात वापरु न देण्यासाठी आम्ही बांधील आहोत.

    अफगाणिस्तानमध्येआ सुरू असलेल्या प्रकल्पांबाबत बोलताना तो म्हणाला की, भारताने अफगाणिस्तानमधील लोकांना आणि देशातील राष्ट्रीय प्रकल्पांना मदत केली आहे. त्यांनी यापूर्वीही मदत केली. त्याचे आम्हाला कौतुक आहे.

    ‘भारताला तुम्ही मित्र मानता की शत्रू?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तुम्ही ‘‘हे तुमच्या सरकारला विचारले पाहिजे की ते तालिबानला मित्र मानतात की शत्रू. जर भारत अफगाणिस्तानमधील जनतेला आमच्याविरोधात लढण्यासाठी बंदुका, शस्त्र आणि स्फोटके पुरवत असेल तर आम्ही याकडे वैर भावनेतून केलेली कारवाई अशा दृष्टिकोनातूनच पाहू.

    Taliban gave ultimatum to India

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या