• Download App
    Take fuel for aircraft from America, otherwise if you have the courage, capture the Strait of Hormuz; Donald Trump's threat to NATO countries!! विमानांचे इंधन अमेरिकेकडून घ्या, नाहीतर हिंमत असेल, तर होर्मूजच्या खाडीवर कब्जा करून दाखवा; डोनाल्ड ट्रम्प यांची NATO देशांना दमबाजी!!

    विमानांचे इंधन अमेरिकेकडून घ्या, नाहीतर हिंमत असेल, तर होर्मूजच्या खाडीवर कब्जा करून दाखवा; डोनाल्ड ट्रम्प यांची NATO देशांना दमबाजी!!

    Donald Trump

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : इराणने होर्मूजची खाडी बंद करून तुमचीच कोंडी केली आहे. तुम्ही विमानांचे इंधन अमेरिकेकडून घ्या, नाहीतर हिंमत असेल, तर होर्मूजची खाडी कब्जात घेऊन दाखवा, शब्दांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो देशांना दमबाजी केली.Take fuel for aircraft from America, otherwise if you have the courage, capture the Strait of Hormuz; Donald Trump’s threat to NATO countries!!

    डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्रूथ अकाउंट वर नाटो सदस्य देशांच्या राजकीय वर्तणुकीवर शरसंधान साधले. डेन्मार्क, फ्रान्स आणि ब्रिटन यांनी इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेला सहकार्य करायचे नाकारले. त्यामुळे ट्रम्प यांनी त्या देशांवर आगपाखड केली. या तिन्ही देशांनी अमेरिकेच्या विमानांना आपल्या हवाई हद्दीचा वापर करून इराणवर हल्ले करायला नकार दिला. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प चिडले.



    डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला सगळा राग ट्रूथ अकाउंट वर काढला. इराणने होर्मूजची खाडी बंद करून तुमचीच कोंडी केली आहे. त्याकडे विमानांना पुरेल एवढे इंधन नाही. तुम्ही अमेरिकेला सहकार्य केले नाही, तरीसुद्धा तुम्हाला विमानांचे इंधन हवे असेल तर अमेरिकेकडून घ्या. आमच्याकडे विमानांसाठी भरपूर इंधन आहे. नाहीतर तुमच्याच हिंमत असेल, तर होर्मूजच्या खाडीवर हल्ला करून तिच्यावर कब्जा करून दाखवा त्यासाठी तुम्हाला अमेरिका मदतीला येणार नाही हे लक्षात ठेवा, अशी दमबाजी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ अकाउंट वरून केली. पण या दमबाजीचा काही परिणाम त्या देशांवर काही झाल्याचे दिसून आले नाही.

    Take fuel for aircraft from America, otherwise if you have the courage, capture the Strait of Hormuz; Donald Trump’s threat to NATO countries!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Trump : अमेरिकेची इराणमध्ये घुसून युरेनियम जप्त करण्याची तयारी; ट्रम्प 10 हजार अतिरिक्त सैनिक पाठवत आहेत

    अशोक खरातला पाठबळ कुणाकुणाचे??; बोचरे सवाल केले वंचित बहुजन आघाडीने

    Italy art : इटलीच्या संग्रहालयात 3 मिनिटांत 3 पेंटिंगची चोरी, एकूण किंमत होती तब्बल 95 कोटी रुपये