• Download App
    Swaminarayan Temple न्यूयॉर्कमध्ये स्वामीनारायण मंदिरात

    Swaminarayan Temple : न्यूयॉर्कमध्ये स्वामीनारायण मंदिरात तोडफोड; पंतप्रधानांविरोधी घोषणा लिहिल्या; भारतीय दूतावासाने नोंदवला निषेध

    Swaminarayan Temple

    वृत्तसंस्था

    न्यूयॉर्क : न्यूयॉर्कमधील मेलविले येथील BAPS स्वामीनारायण मंदिराची  ( Swaminarayan Temple ) तोडफोड करण्यात आली आहे. मंदिराबाहेर मोदींविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. त्याचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने याबाबत आक्षेप नोंदवला आहे. वाणिज्य दूतावासाने म्हटले आहे की, आम्ही हा मुद्दा अमेरिकन कायद्याच्या अंमलबजावणीकडे मांडला आहे आणि हा गुन्हा करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    भारतीय वाणिज्य दूतावासाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “न्यूयॉर्कच्या मेलविले येथे असलेल्या BAPS स्वामीनारायण मंदिरातील तोडफोडीची घटना स्वीकारता येणार नाही.”



    PM मोदींचा 22 सप्टेंबरला दौरा

    मेलविले सफोक काउंटी, लाँग आयलंडमध्ये आहे. हे 16,000-आसन असलेल्या Nassau Veterans Memorial Coliseum पासून अंदाजे 28 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी 22 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मोठ्या सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत.

    हिंदू अमेरिकन फाउंडेशनची मागणी- होमलँड सिक्युरिटीने चौकशी करावी

    फाउंडेशनचे कार्यकारी संचालक सुहाग शुक्ला यांनी सांगितले हिंदू आणि भारतीय संस्थांना अलीकडच्या काळात ज्या धमक्या आहेत त्याच संदर्भात या हल्ल्याकडे पाहिले पाहिजे.

    जानेवारी महिन्यात कॅलिफोर्नियातील मंदिरावर हल्ला

    या वर्षी जानेवारी महिन्यात अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एका हिंदू मंदिरावर हल्ला झाला होता. कॅलिफोर्नियातील हेवर्ड येथील विजय शेरावली मंदिरात खलिस्तानी समर्थकांनी भारतविरोधी गोष्टी लिहिल्या होत्या. खलिस्तानींनी मंदिराच्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्दही लिहिले आहेत. खलिस्तान जिंदाबाद अशा घोषणाही लिहिण्यात आल्या होत्या.

    Swaminarayan Temple vandalized in New York; wrote slogans against the Prime Minister

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या

    Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प इटलीच्या PM मेलोनींना भेटले; युरोपियन युनियनशी व्यापार कराराचे आश्वासन