विशेष प्रतिनिधी
सिमला – भारतीय कंपनी पॅनाशिया बायोटेकने रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीचे उत्पादन सुरु केले आहे. ‘स्पुटनिक व्ही’ लसीचे वर्षाला दहा कोटी डोस पॅनाशिया कंपनी तयार करणार आहे. त्यामुळे भारतातील लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे. Sputanic vaccine production started in India
कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लशींनंतर रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीला भारताने आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. रशियातून या लसीचे डोस भारतात आल्यानंतर १४ मेपासून या लसीचे डोस देण्यास सुरुवात झाली आहे.
पॅनाशिया बायोटेक कंपनीने हिमाचल प्रदेशातील बद्दी येथील कारखान्यात ‘स्पुटनिक व्ही’ लसीची निर्मिती सुरु केली आहे. या कारखान्यात तयार करण्यात आलेल्या लशींची पहिली खेप रशियाच्या गामालेया केंद्रात पाठवली जाणार आहे. तिथे या लसीची गुणवत्ता पारखली जाणार आहे.
‘‘स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती भारतात सुरु झाल्याने त्याचा भारताला फायदा होणार आहे. लसीकरण मोहीम वेगाने झाल्यास जनजीवन सुरळीत होण्यास मदत होईल,’’ असे पॅनाशिया बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जैन यांनी म्हटले आहे.
Sputanic vaccine production started in India
महत्त्वाच्या बातम्या
- सलमान खानचा केआरकेविरुद्ध मानहानीचा खटला, राधेच्या निगेटिव्ह रिव्ह्यूमुळे भडकला ‘सुलतान’
- पंतप्रधान मोदींचे वेसाक ग्लोबल सेलिब्रेशनमध्ये बीजभाषण, जगभरातील बौद्ध संघ प्रमुखांशी व्हर्च्युअली संवाद
- 7 Years Of Modi Government : पीएम मोदींच्या ७ वर्षांच्या सत्तेतील देशात आमूलाग्र बदल करणारे ७ महत्त्वाचे निर्णय
- Coronavirus Cases in India : देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा किंचित वाढ, २४ तासांत २.०८ लाख रुग्णांची नोंद, ४१५७ मृत्यू
- Whatsapp ने भारत सरकारविरुद्ध दाखल केला खटला, नव्या IT नियमांमुळे प्रायव्हसी संपण्याचा दावा