• Download App
    शिंजो आबे : निवडणुकीच्या ऐन प्रचारात टर्निंग पॉईंटवर हत्या झालेले राजीव गांधी, बेनझीर भुट्टोंनंतरचे तिसरे पंतप्रधान!! Shinzo Abe : third former prime minister in the world, assassinated during Election campaign after rajiv Gandhi and Benazir Bhutto

    Shinzo Abe : निवडणुकीच्या ऐन प्रचारात टर्निंग पॉईंटवर हत्या झालेले राजीव गांधी, बेनझीर भुट्टोंनंतरचे तिसरे माजी पंतप्रधान!!

    जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची जपानच्या माजी नौसैनिकाने भर सभेत गोळ्या घालून हत्या केली. शिंजो आबे हे निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी हत्या झालेले जगातले आणि आशिया खंडातील तिसरे माजी पंतप्रधान ठरले आहेत. याआधी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूतल्या श्रीपेरंबदुर येथे प्रचार सभेतच मानवी बॉम्बने हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पाकिस्तानात माजी पंतप्रधान बेनझीर भूतो यांची देखील प्रचार मोहिमेतच कराचीच हत्या करण्यात आली होती. Shinzo Abe : third former prime minister in the world, assassinated during Election campaign after rajiv Gandhi and Benazir Bhutto

    जपानी संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुका सुरू आहेत. शिंजो आबे यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला असला तरी ते त्यांच्या नॅशनल डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये सक्रिय राहिले होते. पक्षाचे नेतृत्व ते करत होते. जपान मधल्या नारा शहरात प्रचार सभेतच जपानच्या माजी नौसैनिकाने त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली.



    विचित्र योगायोग

    राजीव गांधी आणि शिंजो आबे यांच्याबाबत एक विचित्र योगायोग सुद्धा आहे. राजीव गांधी हे श्रीलंकेच्या दौऱ्यावर असताना श्रीलंकेच्या नौसैनिकानेच त्यांच्यावर बंदुकीच्या दस्त्याने हल्ला केला होता. मात्र त्या हल्ल्यातून राजीव गांधी आपल्या चपळाईमुळे बचावले होते. आज 8 जुलै 2022 रोजी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची त्यांच्याच देशातल्या माजी नौसैनिकाने गोळ्या घालून हत्या केली आहे.

    आंतरराष्ट्रीय कट

    आंतरराष्ट्रीय गट राजीव गांधी बेनेजर बिट्टू या दोन्ही माजी पंतप्रधानांच्या हत्येमागे मोठे आंतरराष्ट्रीय कट होते. ते नंतर उघडही झाले. पण त्यातली त्यातल्या काही गोष्टी आजही “झाकलेल्या” अवस्थेतच आहेत. परंतु ज्यावेळी एखाद्या देशाचा पंतप्रधान देशाला वेगळ्या वळणावर नेऊ इच्छित असतो आणि त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यमान संरचनेवर दूरगामी परिणाम होणार असतो त्यावेळी त्याने त्याला “एलिमिनेट” केले जाते हे आंतरराष्ट्रीय कटाचे सूत्र असते. 1991 मध्ये राजीव गांधी पुन्हा सत्तेवर आले असते तर तेच दीर्घकाळ भारताचे पंतप्रधान राहू शकले असते. कारण तेव्हा ते 50 वर्षांचे होते. बेनझीर भुट्टो या देखील तुलनेने तरुण होत्या. परवेज मुशर्रफ यांची लष्करी राजवट हटवून त्या पाकिस्तानात लोकशाही मार्गाने सत्तेवर येऊ शकले असत्या. त्यांची लोकप्रियता त्यावेळी शिगेला पोहोचत होती.

    या दोन्ही माजी पंतप्रधानांची हत्या करून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना आंतरराष्ट्रीय पातळीवर काही काळ कुंठीत करण्यात कारस्थान रचणाऱ्या शक्ती यशस्वी झाल्या होत्या.

    कट्टर चीनविरोधी

    शिंजो आबे हे आंतरराष्ट्रीय राजकारणात कट्टर चीन विरोधक मानले गेले भारत ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरिका अर्थात क्वाडच्या संस्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. किंबहुना 2007 मध्ये त्यांच्याच पंतप्रधान पदाच्या काळात क्वाडची स्थापना केली होती. ते त्याचे संस्थापक सदस्य होते. जेव्हा ही संघटना 2020 नंतर अधिक मजबुतीने उभी राहत आहे, चीनला खऱ्या अर्थाने आर्थिक आणि सामाजिक पातळीवर प्रचंड संघर्ष करावा लावण्याइतपत क्वाड संघटना मजबूत होत आहे त्यावेळी शिंजो आबे यांना “एलिमिनेट” करण्यात आले आहे.

     क्वाड पंतप्रधानांची सुरक्षा चिंता

    यामागे मोठा आंतरराष्ट्रीय गट नेमका काय असू शकतो??, याविषयी जपान सह जगात चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर क्वाड देशातल्या प्रमुख नेत्यांच्या सुरक्षेविषयी गहिरी चिंता देखील त्यातून उघड होत आहे.

    Shinzo Abe : third former prime minister in the world, assassinated during Election campaign after rajiv Gandhi and Benazir Bhutto

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या