• Download App
    सौदी अरेबिया-चीनचा पाकिस्तानवर दबाव, लष्कराला इम्रान यांच्याशी समेट करण्याची इच्छा, तुरुंगामध्ये मनधरणी सुरू|Saudi Arabia-China pressure on Pakistan, army wants to reconcile with Imran, protest starts in jail

    सौदी अरेबिया-चीनचा पाकिस्तानवर दबाव, लष्कराला इम्रान यांच्याशी समेट करण्याची इच्छा, तुरुंगामध्ये मनधरणी सुरू

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : पाकिस्तानच्या तुरुंगात कैद माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी पाक लष्कराला जुळवून घेण्याची इच्छा आहे. चीन आणि सौदी अरेबियाने गुंतवणुकीसाठी राजकीय शांतता ठेवण्याचे अट घातली आहे हे त्याचे कारण आहे. नुकतचे सौदी अरबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान अल सौदी यांनी गेल्या आठवड्यात पाकिस्तान दौऱ्यात सांगितले की, पाकिस्तानने राजकीय तणाव मिटवून गुंतवणुकीसाठी वातावरण अधिक अनुकूल करावे.Saudi Arabia-China pressure on Pakistan, army wants to reconcile with Imran, protest starts in jail

    याआधी चिनी विदेशमंत्र्यांनीही गेल्या वर्षी इस्लामाबाद दौऱ्यादरम्यान तत्कालीन पीएम शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्याशी देशातील राजकीय अनिश्चितता संपवण्यास सांगितले होते. यादरम्यान पाकिस्तानने सौदी अरेबियाला आश्वासन दिले की, नजीकच्या भविष्यात राजकीय वातावरणात सुधारणा होईल, कारण लष्कर आणि इम्रान यांच्यात चर्चा सुरू आहे. वृत्तानुसार, पाक लष्कर आणि इम्रान यांच्यात तुुरुंगात गुप्त बैठकांचे सत्र सुरू आहे.



    नवाज यांचे निकटवर्तीय अब्बासींची मध्यस्थी

    इम्रान व लष्करातील समेटासाठी २ तटस्थ राजकीय नेते व सेवानिवृत्त लेफ्ट. जनरल मध्यस्थी करत आहेत. राजकीय चर्चांनुसार, प्रकरणाची मध्यस्थी शाहिद खाकन अब्बासी करत आहेत. ते माजी पीएम नवाज शरीफ यांचे निकटवर्तीय आहेत. मरियम नवाज यांना पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष केल्यानंतर अब्बासींनी पीएमएलएन सोडले. त्यांनी निवडणूक न लढता पक्ष स्थापन केला.

    इम्रान यांनी ९ मेची जबाबदारी घ्यावी

    तुरुंगातील बैठकीदरम्यान पाकिस्तानी लष्कराकडून इम्रान यांना सांगितले की, एक तर ९ मेच्या दंगलीची जबाबदारी घ्यावी किंवा कठोर कारवाईला सामोरे जावे. इम्रान यांनी जबाबदारी घेण्यास नकार देत अदियाला तुुरुंगात मीडियाशी बोलताना पत्नी बुशरा बीबीला कथितरित्या विष देण्यासाठी जनरल असीम मुनीर यांना जबादार ठरवले.

    Saudi Arabia-China pressure on Pakistan, army wants to reconcile with Imran, protest starts in jail

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Shahbaz : PAK पंतप्रधानाचा खोटारडेपणा; शाहबाज म्हणाले- भारताकडून आधी युद्धबंदीचे उल्लंघन; रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणार

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    American Pope : नवीन पोपची घोषणा झाली, रॉबर्ट प्रीव्होस्ट सर्वात मोठे ख्रिश्चन धर्मगुरू, पहिले अमेरिकी पोप