• Download App
    अबब... भारतीय घराणेशाहीही लाजेल! एकाच घरात राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान व सात मंत्री!! श्रीलंकेत फक्त राजपक्ष कुटुंबाचीच सत्ता|Rajpakashe family virtually rules on sri lanka

    अबब… भारतीय घराणेशाहीही लाजेल! एकाच घरात राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान व सात मंत्री!! श्रीलंकेत फक्त राजपक्ष कुटुंबाचीच सत्ता

    विशेष  प्रतिनिधी

    कोलंबो : राजपक्ष बंधूंपैकी सर्वांत लहान असलेल्या बसिल राजपक्ष (वय ७०) यांचा देशाचे अर्थमंत्री म्हणून शपथविधी झाला. यामुळे श्रीलंकेवरील राजपक्ष कुटुंबाची पकड आणखीनच घट्ट झाल्याचे मानले जात आहे.Rajpakashe family virtually rules on sri lanka

    राजपक्ष बंधूंपैकी गोटाबया राजपक्ष हे देशाचे अध्यक्ष आहेत, तर महिंदा राजपक्ष हे पंतप्रधान आहेत. सर्वांत मोठे बंधू चमल हे देशाचे कृषिमंत्री आहेत. आजच्या शपथविधीमुळे राजपक्ष कुटुंबातील आता सात जण महत्त्वाच्या पदांवर विराजमान आहेत.



    महिंदा यांचे ज्येष्ठ पुत्र नमल हे क्रीडा मंत्री आहेत, तर चमल यांचे पुत्र शशींद्र हे राज्य मंत्री आहेत. राजपक्ष बंधूंचे भाचे असलेले निपुण रणवाका हे देखील मंत्री आहेत. महिंदा राजपक्ष हे देशाचे अध्यक्ष असतानाच्या काळात बासिल हे त्यांचे प्रमुख सल्लागार होते.

    आता त्यांच्याकडे देशाची आर्थिक सूत्रे आली आहेत. संसदेचे सदस्यच केवळ मंत्री होऊ शकत असल्याने निवडणूक न लढविलेल्या बसिल यांची निवडून आलेल्या सदस्यांमार्फत संसदेत निवड करण्यात आली.

    Rajpakashe family virtually rules on sri lanka

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या