• Download App
    पाकिस्तानात केवळ दही घेण्यासाठी रेल्वेचालकाने थांबविली चालती रेल्वे|Railway driver stops railway, sacked in Pakistan

    पाकिस्तानात केवळ दही घेण्यासाठी रेल्वेचालकाने थांबविली चालती रेल्वे

    वृत्तसंस्था

    लाहोर – जगात कधी काय घडेल याचा नेम नसतो. आता पाकिस्तानातील रेल्वे कर्मचाऱ्याच्या या कृत्याने सारे आवाक झाले आहेत. तेथे कवळ दही घेण्यासाठी रेल्वेच्या चालकाने चक्क रेल्वेच थांबवल्याचे स्पष्ट झाले आहे. दह्याच्या नादाता एखादा भीषण अपघात होवू शकतो हे त्या चालकाच्या गावीही नसल्याचे दिसून आले.Railway driver stops railway, sacked in Pakistan

    दही खरेदी करण्यासाठी रेल्वे थांबविणाऱ्या या रेल्वेचालक आणि त्याच्या सहकाऱ्याची आता येथील रेल्वे प्रशासनाने नोकरीतून थेट हकालपट्टी केली आहे. या रेल्वेचालकाचा याबाबतचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता.



    चालती रेल्वे थांबवून रेल्वेचालक दही घेण्यासाठी उतरतो आणि पुन्हा रेल्वेत बसून ती पुढे नेतो, असे या व्हिडिओमध्ये दिसत होते. या व्हिडिओची बरीच चर्चाही झाली होती.साऱ्या पाकिस्तनात यावरून बरीच टीका झाली. त्याची दखल प्रसासनाला अखेऱ घ्यावी लागली. रेल्वेमंत्री आझम खान यांच्या नजरेस ही बाब आणून दिल्यानंतर त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

    Railway driver stops railway, sacked in Pakistan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    France Returns King Toera : फ्रान्सने मादागास्करच्या राजाची कवटी परत केली; 128 वर्षांपूर्वी शिरच्छेद करून फ्रेंच सैनिकांनी नेली होती

    America : अमेरिका रशियासोबत व्यापार करू इच्छिते; बंदी उठवण्याचा विचार; रशियन अणुऊर्जा जहाजे खरेदी करण्याची तयारीही

    Trump : ट्रम्प यांची चीनवर 200% टॅरिफची धमकी; म्हणाले- माझ्याकडे असे कार्ड आहेत, ते उघडले तर चीन नष्ट होईल