• Download App
    अल कायदा प्रमुख अल जवाहिरी अद्यापही जिवंतच! व्हिडिओ प्रसिद्ध करून अमेरिकेविरोधात वक्तव्यQaeda Chief Ayman Al Zawahiri Video Released, Surfaces On 20th Anniversary Of 9 11 Attack In Us

    अल कायदा प्रमुख अल जवाहिरी अद्यापही जिवंतच! व्हिडिओ प्रसिद्ध करून अमेरिकेविरोधात वक्तव्य

    अल कायदाचा प्रमुख आयमन अल-जवाहिरीच्या मृत्यूचा दावा पुन्हा एकदा खोटा सिद्ध झाला आहे. ९/११ दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त इंटरनेटवर जारी करण्यात आलेल्या 60 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये हे उघड झाले आहे. या व्हिडिओचे शीर्षक आहे ‘जेरुसलेम ज्यूईश होणार नाही’.Al Qaeda Chief Ayman Al Zawahiri Video Released, Surfaces On 20th Anniversary Of 9 11 Attack In Us


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : अल कायदाचा प्रमुख आयमन अल-जवाहिरीच्या मृत्यूचा दावा पुन्हा एकदा खोटा सिद्ध झाला आहे. ९/११ दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त इंटरनेटवर जारी करण्यात आलेल्या 60 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये हे उघड झाले आहे. या व्हिडिओचे शीर्षक आहे ‘जेरुसलेम ज्यूईश होणार नाही’.

    ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल जवाहिरीला अल कायदाचा प्रमुख बनवण्यात आले. तो बराच काळ बेपत्ता होता. जवाहिरीचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याची बातमी नोव्हेंबर 2020 मध्येही समोर आली, त्यानंतर जवाहिरीचा कोणताही व्हिडिओ समोर आला नाही किंवा त्याच्याशी संबंधित कोणतीही माहिती समोर आली नाही.

    परंतु अमेरिकेतील ९/११ हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त अल-कायदाने अल-जवाहिरीचा एक नवीन व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये अल-जवाहिरी पूर्णपणे निरोगी दिसत असून अमेरिकेच्या विरोधात गरळ ओकताना दिसत आहे.

    अल जवाहिरी व्हिडीओमध्ये अमेरिकेतील ९/११ च्या हल्ल्याचा उल्लेख करताना दिसत आहे. अल जवाहिरी म्हणतोय की, आपण इस्लामच्या त्या 19 मुजाहिदीन योद्ध्यांना विसरू नये ज्यांनी अमेरिकेचे हृदय घायाळ केले. त्यांनी असा हल्ला केला की अमेरिका ती जखम अजून विसरली नाही. व्हिडिओमध्ये जवाहिरीने अफगाणिस्तानवर फक्त एकदाच चर्चा केली. तो म्हणाला की, 20 वर्षांच्या लढाईनंतर हतबल आणि विखुरलेल्या अमेरिकेला अखेर अफगाणिस्तानातून पळ काढणे भाग पडले. अल-जवाहिरीने काश्मिरी जिहादी इलियास काश्मिरी आणि अल कायदा भारत उपखंडातील प्रमुख मौलाना असीम उमर यांचीही आठवण काढली.

    जवाहिरी अमेरिकेच्या मोस्ट वॉन्टेड यादीत

    अल जवाहिरी अमेरिकेच्या दहशतवाद्यांच्या मोस्ट वाँटेड यादीत आहे. अमेरिकन सरकारने त्याच्यावर नागरिकांच्या हत्येचा आरोप केला आहे. अमेरिकेबाहेर अमेरिकन नागरिकांच्या हत्येच्या कटातही तो सहभागी होता. अमेरिकन सरकारने आयमन अल-जवाहिरीवर अडीच कोटी डॉलरचे बक्षीस ठेवले होते.

    व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक देश सतर्क

    अल जवाहिरीचा हा व्हिडिओ समोर आल्यापासून जगातील अनेक देशांच्या सरकारांनी चिंता व्यक्त केली आहे आणि सैन्याला खबरदारी घेण्यास सांगितले आहे.

    l Qaeda Chief Ayman Al Zawahiri Video Released, Surfaces On 20th Anniversary Of 9 11 Attack In Us

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या