विशेष प्रतिनिधी
कराची : मानवी नातेसंबंध हे एक कोडेच आहे असे म्हणावे लागेल. कधी कोणाचे कोणावर प्रेम जडेल, कधी कोण कोणाचा द्वेष करेल, कधी या द्वेषातून कोणती टोकाची घटना घडेल काही सांगता येत नाही. पाकिस्तानमध्ये नुकतीच अशी एक घटना घडली आहे. या घटनेमध्ये एका पुरुषाच्या मृतदेहाचे तुकडे घरभर पसरलेले आढळून आले आणि याच घरामध्ये एक महिला अतिशय शांतपणे झोपल्याचे देखील आढळून आले. पोलिसांनी सदर महिलेला संभाव्य आरोपी म्हणून अटक केली आहे.
pieces of male’s dead body and blood all over the floor while woman sleeps peacefully in the same house…what is the whole matter?
तर काय आहे पूर्ण घटना?
कराचीमधील सद्यर भागामधील पोलिस चौकीमध्ये एक फोन आला की एका इमारतीच्या मागे मानवी अवयवाचे काही तुकडे पडलेले आहेत. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या इमारतीमध्ये गेल्या नंतर त्यांना दारामध्ये देखील मानवी शरीराचे काही अवयव आढळून आले. त्यांनी दरवाजा उघडून घरामध्ये प्रवेश केला. तर एका पुरुषाच्या मृतदेहाचे तुकडे घरभर पसरले होते. सर्वत्र रक्त पसरले होते आणि या सर्व पसाऱ्यात एक महिला अतिशय शांतपणे झोपली होती. पोलिसांनी या महिलेला सभांव्य आरोपी म्हणून अटक केली आहे.
Singhu Border Murder Case: 4 निहंग गजाआड, लखबीर सिंग हत्याप्रकरणी दोघांना अटकेत; दोघांचे सरेंडर
जेव्हा या महिलेची चौकशी केली, तेव्हा तिने सदर व्यक्ती आपला पती असल्याचे सांगितले. काही काळाने आपले मत बदलून, आपले लग्न झाले नसून तो व्यक्ती आपला दीर आहे असे सांगितले. शेजारी राहणाऱ्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिला आणि मृत पुरुष लिव्ह इनमध्ये राहत होते, असे सांगण्यात आले.
महिलेच्या कपड्यांवर लागलेले रक्ताचे डाग आणि घरात सापडलेली हत्यारे यावरून पोलिसांनी महिला संभाव्य आरोपी असल्याची शक्यता वर्तवली आहे. पोलिसांना घटनास्थळावर एक चाकु, एक हातोडा देखील सापडला आहे.
pieces of male’s dead body and blood all over the floor while woman sleeps peacefully in the same house…what is the whole matter?
महत्त्वाच्या बातम्या
- वासीम रिझवीं पाठोपाठ मल्याळी दिग्दर्शक अली अकबरही इस्लाम सोडणार; हिंदू धर्म स्वीकारणार!!
- CDS Bipin Death : सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीच्या अस्थींचे आज गंगेत विसर्जन, मुली घेऊन जाणार
- आपला तिरंगा नेहमीच उंच राहील, सीडीएस बिपिन रावत यांनी येथूनच घेतले प्रशिक्षण – राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे उत्तराखंडमध्ये संबोधन
- नवाब मलिकांचा म्हणाले, “आज-उद्या घरी सरकारी पाहुणे येणार! गांधी गोर्यांशी लढले, आम्ही चोरांशी लढू”
- पुणे जिल्ह्यात १७ लाख रुपयांचा गुटखा पकडला ; यवत येथे पोलिसांची कारवाई
- इस्लामपूरचे “ईश्वरपूर” नामकरणाच्या आंदोलनात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची उडी