• Download App
    पेंटागॉनचा गंभीर इशारा, पुढच्या सहा महिन्यांत इस्लामिक स्टेट अमेरिकेवर हल्ला करण्याची शक्यता । Pentagon Official Warns that Islamic State Could Attack On USA Within Six Months

    पेंटागॉनचा गंभीर इशारा, पुढच्या सहा महिन्यांत इस्लामिक स्टेट अमेरिकेवर हल्ला करण्याची शक्यता

    Islamic State : मंगळवारी माहिती देताना पेंटागॉनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेला भीती आहे की, अफगाणिस्तानात स्थित इस्लामिक स्टेट सहा महिन्यांत अमेरिकेवर मोठा हल्ला करू शकते. Pentagon Official Warns that Islamic State Could Attack On USA Within Six Months


    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : मंगळवारी माहिती देताना पेंटागॉनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेला भीती आहे की, अफगाणिस्तानात स्थित इस्लामिक स्टेट सहा महिन्यांत अमेरिकेवर मोठा हल्ला करू शकते.

    अमेरिकेचे संरक्षण उच्च सचिव कॉलिन काहल यांनी म्हटले आहे की, अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतली असली तरी धोका संपलेला नाही. अफगाणिस्तानातील युद्ध तालिबानने जिंकले असेल, पण तरीही त्यांना इस्लामिक स्टेटच्या आव्हानाला सामोरे जावे लागत असल्याचे काहल म्हणाले.

    तालिबान इस्लामिक स्टेटचा दहशतवाद रोखू शकतील की नाही याचे आकलन करणे कठीण असल्याचे ते म्हणाले. जर दहशतवादी गटाने अफगाणिस्तानवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर ते अमेरिकेसाठीही धोक्याचे ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

    इस्लामिक स्टेट आणि तालिबान एकमेकांचे शत्रू

    इस्लामिक स्टेट ऑफ खोरासान आणि तालिबान हे एकमेकांचे शत्रू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे तालिबानला सावधपणे पाऊल टाकावे लागेल. इस्लामिक स्टेटकडे काही हजार दहशतवाद्यांचे कॅडर आहे, जे वाढवण्याचे काम ते अमेरिकेसह इतर देशांमध्ये करत आहेत.

    Pentagon Official Warns that Islamic State Could Attack On USA Within Six Months

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    पुरोगामी महाराष्ट्राच्या नुसत्याच तोंडी वाफा; दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी घरात काढल्या झोपा!!; वाचा मतदानाचा आकडा!!