• Download App
    पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड शाहिद लतीफची पाकिस्तानात हत्या Pathankot attack mastermind Shahid Latif killed in Pakistan

    पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड शाहिद लतीफची पाकिस्तानात हत्या

    या हल्ल्यात भारतीय लष्कराचे सात जवान शहीद झाले होते.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी शाहिद लतीफची पाकिस्तानमध्ये हत्या करण्यात आली आहे. 2016 मध्ये पंजाबमधील पठाणकोट एअरबेसवर दहशतवादी हल्ला झाला होता. Pathankot attack mastermind Shahid Latif killed in Pakistan

    जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला होता. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे सात जवान शहीद झाले. एनआयएच्या तपासात शाहिद लतीफ हा या हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचे समोर आले आहे.

    पठाणकोट दहशतवादी हल्ल्याची योजना पाकिस्तानातच घडवून आणली गेली होती, असेही एनआयएच्या तपासात उघड झाले आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने चार आत्मघाती हल्लेखोरांना प्रशिक्षण देऊन हल्ला करण्यासाठी पाठवले होते.

    लतीफ जैशचा लाँचिंग कमांडर म्हणून ओळखला जातो. त्याने जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांना पठाणकोटमध्ये पाठवले होते. 47 वर्षीय शाहिद लतीफ हा पाकिस्तानातील गुजरानवाला येथील अमीनाबाद शहरातील रहिवासी होता.

    Pathankot attack mastermind Shahid Latif killed in Pakistan

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Eileen Wang : अमेरिकेची माजी महापौर चिनी गुप्तहेर निघाली:बेकायदेशीरपणे चीनसाठी काम केल्याची कबुली दिली

    Netanyahu : नेतन्याहू म्हणाले- इराणचे नवे सर्वोच्च नेते जिवंत; बंकरमध्ये लपलेले, सत्तेवर वडील खामेनींसारखी पकड नाही, जनतेच्या बंडाची भीती

    Trump : ट्रम्प 13 ते 15 मे दरम्यान चीनला भेट देतील; जिनपिंग यांच्याशी इराण, व्यापार आणि तैवान मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता