• Download App
    अफगाणिस्तानवर पाकिस्तानचा हवाई हल्ला : हल्ल्यात ४० हून अधिक ठार, तालिबान सरकार म्हणाले- आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका|Pakistani airstrikes on Afghanistan: More than 40 killed in attack, Taliban government says don't test our patience

    अफगाणिस्तानवर पाकिस्तानचा हवाई हल्ला : हल्ल्यात ४० हून अधिक ठार, तालिबान सरकार म्हणाले- आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका

    शनिवारी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या खोस्त आणि कुनार प्रांतात हवाई हल्ले केले. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेसा मिला आणि मीर सफर येथे झालेल्या बॉम्बहल्ल्यात 5 मुले आणि 1 महिला ठार झाली. तथापि, स्थानिकांचे म्हणणे आहे की, हा हल्ला खोस्टच्या स्पेरा जिल्ह्यात झाला, ज्यामध्ये 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.Pakistani airstrikes on Afghanistan: More than 40 killed in attack, Taliban government says don’t test our patience


    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : शनिवारी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या खोस्त आणि कुनार प्रांतात हवाई हल्ले केले. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेसा मिला आणि मीर सफर येथे झालेल्या बॉम्बहल्ल्यात 5 मुले आणि 1 महिला ठार झाली. तथापि, स्थानिकांचे म्हणणे आहे की, हा हल्ला खोस्टच्या स्पेरा जिल्ह्यात झाला, ज्यामध्ये 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हवाई हल्ल्यानंतर अफगाणिस्तानच्या लोकांनी रस्त्यावर उतरून पाकिस्तानचा निषेध केला.

    या हल्ल्याबाबत पाकिस्तान सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानवर (टीटीपी) तेथे हवाई हल्ले केल्याचे तेथील माध्यमांचे म्हणणे आहे.



    हवाई हल्ल्यानंतर पाक राजदूताला बोलावण्यात आले

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. हवाई हल्ल्यानंतर तालिबान सरकारने पाकिस्तानचे राजदूत मन्सूर अहमद खान यांना बोलावले. यावेळी अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी आणि उपसंरक्षण मंत्री अलहाज मुल्ला शिरीन अखुंद उपस्थित होते.

    अफगाणिस्तानच्या संयमाची परीक्षा घेऊ नका

    तालिबानचा प्रवक्ता जबिउल्ला मुजाहिद यांनी ट्विट करून पाकिस्तान सरकारला इशारा दिला आहे. ते म्हणाले- अफगाणिस्तान सरकार पाकिस्तानकडे मागणी करते की, अशा परिस्थितीत अफगाणिस्तानच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. अशी चूक पुन्हा झाली तर त्याचे वाईट परिणाम होतील. दोन्ही देशांमधील समस्या राजकीय मार्गाने सोडवल्या पाहिजेत.

    Pakistani airstrikes on Afghanistan: More than 40 killed in attack, Taliban government says don’t test our patience

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सौदी अरेबिया-चीनचा पाकिस्तानवर दबाव, लष्कराला इम्रान यांच्याशी समेट करण्याची इच्छा, तुरुंगामध्ये मनधरणी सुरू

    अमेरिकेने युक्रेनला गुप्तपणे लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे दिली; रशियात 300 किमीपर्यंत हल्ल्यास सक्षम

    भारताशी व्यापार सुरू करण्याची पाक व्यावसायिकांची मागणी; PM शाहबाज शरीफ यांच्यावर आणला दबाव