• Download App
    पाकिस्तान सर्बिया एम्बेसीने पगार न दिल्याचे केले पाकिस्तानी सरकार विरुद्ध आरोप | Pakistan Serbia embassy accuses Pakistani government of not paying salaries

    पाकिस्तान सर्बिया एम्बेसीने पगार न दिल्याचे केले पाकिस्तानी सरकार विरुद्ध आरोप

    विशेष प्रतिनिधी

    सर्बिया : पाकिस्तानच्या सर्बिया देशातील एम्बेसीने इम्रान खानच्या पाकिस्तानी सरकार विरुद्ध सनसनीत आरोप केले आहेत. त्यांनी एका ट्विट द्वारे हे आरोप केले होते. हे ट्विट आत्ता डिलीट करण्यात आले आहे.

    Pakistan Serbia embassy accuses Pakistani government of not paying salaries

    ह्या ट्वीट मध्ये लिहिल्या प्रमाणे, पाकिस्तान सरकारने सर्बिया मधिल एम्बेसीत काम करणाऱ्या व्यक्तींना मागील तीन महिन्या पासून पगार दिलेला नाहीये. ह्याचा परिणाम असा होतोय की आम्हाला आमच्या मुलांच्या शाळेच्या फी भरणे देखील कठीण झाले आहे. असे अजून किती दिवस आम्हाला तुमच्या साठी काम करावे लागणार आहे. असा प्रश्न सर्बिया मधील पाकिस्तानी कर्मचाऱ्यांनी इम्रान खान यांना विचारला होता.


    PakistanstandswithIndia : आम्ही तुमच्यासोबत आहोत, खचून जाऊ नका ; पाकिस्तानी जनतेच्या भारतीयांसाठी प्रार्थना


    काही काळाने हे ट्विट जरी डिलीट करण्यात आले असले तरी ह्या ट्विटचा स्क्रिन शॉट सध्या ट्विटरवर व्हायरल होतोय. पाकिस्तान मधील विरोधी पक्षाने ह्यावर आपले मत व्यक्त करताना म्हटले आहे की, पाकीस्तानला बेरोजगारी, ढासळलेली अर्थव्यवस्था ह्यांचे परिणाम भोगावे लागत आहेत.

    तर हामझा अझहर सलाम यांनी दिलेल्या माहिती नुसार, पाकिस्तान सरबिया एम्बेसीचे अकाउंट हॅक करण्यात आले होते. सर्व कर्मचाऱ्यांचे पगार दोन दिवसापुर्वी देण्यात आले आहेत.

    Pakistan Serbia embassy accuses Pakistani government of not paying salaries

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    China : चीनने म्हटले- अमेरिकेने जपानमधून टायफून क्षेपणास्त्र प्रणाली काढावी; यामुळे प्रदेशाच्या सुरक्षेला धोका

    Trump : ब्रिटनच्या शाही राजवाड्यात ट्रम्प यांचे भव्य स्वागत; किंग चार्ल्ससोबत सोन्याच्या बग्गीतून प्रवास

    Nepal : नेपाळमध्ये 6 पक्षांच्या प्रमुख नेत्यांना हटवण्याची मागणी; जेनझी आंदोलकांनी म्हटले- जुने चेहरे सहन करणार नाही