विशेष प्रतिनिधी
लाहोर : जागतिक बँकेने नुकताच जाहीर केलेल्या अहवालाप्रमाणे पाकिस्तान हा देश जगातील सर्वांत मोठ्या दहा कर्जदार देशांपैकी एक बनला आहे. बांग्लादेश, अंगोला, घाणा, इथोपिया, केनिया, मंगोलिया, पाकिस्तान, नायजेरिया, उजबेकिस्तान आणि झांबिया या देशांचा जगातील सर्वांत दहा मोठ्या विदेशी कर्जदार देशांच्या यादीमध्ये समावेश झाला आहे.
Pakistan is one of the 10 largest creditors in the world
यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणखी डळमळीत झाली आहे. Data service suspension initiative याअंतर्गत जारी केलेल्या यादीमध्ये पाकिस्तान देशाचा देखील समावेश झाला आहे. या यादीमध्ये समावेश झाल्यामुळे पाकिस्तान आता इथून पुढे परदेशी कर्ज मिळण्यास असमर्थ ठरणार आहे.
Pakistan Bus Blast : पाकिस्तानच्या पेशावरमध्ये बसचा स्फोट, नऊ चिनी मजुरांसह 13 जण ठार
द न्यूज इंटरनॅशनलने दिलेल्या वृत्तानुसार, जागतिक बँकेने सोमवारी आंतरराष्ट्रीय कर्ज आकडेवारी 2022 जारी केली होती. यामध्ये मोठय़ा कर्जदारांसह डी एस एस आय अंतर्गत देशांना मिळणाऱया कर्जाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फरक निर्माण झाला आहे. 2022 च्या वर्षाखेरीपर्यंत 10 सर्वात मोठय़ा जेडीएसआय कर्जदारांचे एकूण बाह्य कर्ज ५०९ अब्ज डॉलर इतके होते. ही रक्कम 2019च्या तुलनेमध्ये 12 टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे डीएसएसआयने जारी केल्याप्रमाणे त्या 10 देशांनी घेतलेले कर्ज एकूण परकीय कर्जांच्या ५९ टक्के इतके आहे.
2020च्या अखेरीस डी एस एस आय च्या कार्यक्षेत्रात असलेल्या या देशांचा असुरक्षित विदेशी कर्जांमध्ये सुमारे 65% टक्के इतका वाटा होता. पाकिस्तान सरकारवर असलेल्या एकूण कर्जाचा बोजापैकी फक्त इम्रान खान सरकारच्या काळात 40% टक्के इतका आहे. प्रामुख्याने कोरोना महामारीमुळे पाकिस्तानच्या अर्थ व्यवस्थेची उतरती कळा सुरू झालीये.
Pakistan is one of the 10 largest creditors in the world
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या काळात सर्वात धडाडीचे काम योगी सरकारचे, ऑक्सिजन कमतरतेवर यशस्वी मात, कानपुर आयआयटीकडून कौतुक
- ऐन दसरा – दिवाळीच्या तोंडावर सिलिंडर दरवाढीने ग्राहक गॅसवर, वर्षात तीनशे रुपयांची दरवाढ
- जगभरात आपल्या देशाचं नाव प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या नेहा नारखेडे
- कोव्हिशिल्डची ‘ब्लूप्रिंट’ चोरून रशियान बनविली ‘स्पुटनिक’ लस, ब्रिटनचा खळबळजनक आरोप