विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – पाकिस्तान दहशतवाद्यांचे नंदनवन असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. अमेरिकेच्या कॉंग्रेसनल रिसर्च सर्व्हिसच्या अहवालानुसार ब्बल १२ दहशतवादी संघटनांची पाळेमुळे पाकिस्तानात रुजली आहेत. पाकिस्तानात वाढणाऱ्या लष्करे तय्यबा, जैशे महंमदसह पाच कट्टर दहशतवादी संघटनांच्या रडारवर भारत असल्याचे म्हटले आहे.Pakistan is heaven of terrorist
सीआरएसच्या अहवालात म्हटले की, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील पाकिस्तान हे दहशतवादी संघटनांचे आश्रयस्थान असल्याचे मान्य केले आहे. यापैकी काही संघटना १९८० च्या दशकापासून सक्रिय आहेत. पाकिस्तानातून दहशतवादी संघटनांचे संचालन होते. यात जागतिक स्तरावरच्या दहशतवादी संघटना, अफगाणिस्तान केंद्रित संघटना, भारत आणि काश्मी र केंद्रित संघटना, अंतर्गत सक्रिय संघटना आणि धार्मिक दहशतवादी संघटनांचा समावेश आहे.
लष्करे तय्यबाची स्थापना १९८० च्या दशकात झाली. २००१ रोजी या संघटनेला विदेश दहशतवादी संघटनेच्या यादीत समाविष्ट केले. जैशे महंमदची स्थापना २००० मध्ये दहशतवादी मसूद अझहरने केली. २००१ मध्ये याही संघटनेला विदेशी दहशतवादी संघटनेच्या सूचीत सामील केले.
हरकत उल जिहादी इस्लामी या संघटनेची स्थापना १९८० च्या दशकात अफगाणिस्तानात तत्कालीन सोव्हिएत सैनिकांशी लढण्यासाठी केली होती. २०१० रोजी या संघटनेचा विदेशी दहशतवादी संघटनांत समावेश केला. १९८९ नंतर या संघटनेने भारताकडे लक्ष केंद्रित केले. त्याचबरोबर अफगाणिस्तान तालिबानसाठी युवकांची भरती करण्याचे काम या संघटनेमार्फत व्हायचे.
हिज्बुल मुजाहिदीन दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिदीनची निर्मिती १९८९ रोजी झाली. २०१७ रोजी या दहशतवादी संघटनेला विदेशी दहशतवादी संघटनांत सामील केले. जम्मू काश्मीररमध्ये घातपाती कारवायात हिज्बुल संघटनेचा मोठा सहभाग असतो. तसेच तेथे कारवाया करणारी सर्वात जुनी संघटना म्हणूनही ओळखली जाते. सीआरएसच्या मते, अन्य दहशतवादी संघटनांत अल कायदाचा देखील समावेश आहे. या संघटनेला कराची, आदिवासी भाग, अफगाणिस्तानातून चालवण्यात येते.
Pakistan is heaven of terrorist
महत्त्वाच्या बातम्या
- माझ्या कोकणवासीयांना साद, हातात हात गुंफून विकासाच्या यात्रेत सहभागी होऊयात! – नारायण राणे
- वसुली म्हटल्यावर सरकारचा ‘ससा’, शेतकऱ्यांना मदत म्हटलं की ‘कासव’; मदत तर त्याहून संतापजनक, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- भाजप विरोधात भाषणे करून ममता बॅनर्जी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसताहेत; अधीर रंजन चौधरी यांचे अचूक शरसंधान!!
- दुर्गा सन्मान : महिला आणि मुलींच्या संरक्षण – सक्षमीकरणात कायमच आघाडीवर!!, वैशाली केनेकर
- लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपींना अटक का करत नाही?, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल