• Download App
    Pakistan पाकिस्तानची नाचक्की, अफगाण हल्ल्यांनंतर पाकिस्ताननेच केली युद्धबंदीची याचना

    Pakistan : पाकिस्तानची नाचक्की, अफगाण हल्ल्यांनंतर पाकिस्ताननेच केली युद्धबंदीची याचना

    Pakistan

    विशेष प्रतिनिधी

    काबूल / इस्लामाबाद : Pakistan भारताकडून आधीच धडा शिकलेला पाकिस्तान, आता तालिबानकडूनही दणका खात नम्र झाला आहे. दक्षिण आशियात ‘कमकुवत राष्ट्र’ ठरल्याचे चित्र अधिक स्पष्ट होत आहे. तालिबानसमोरही पाकिस्तानचे गुडघे टेकले आहेत. बुधवारी अफगाणिस्तानवर केलेल्या बॉम्बहल्ल्यांनंतर झालेल्या प्रत्युत्तर हल्ल्यांनी पाकिस्तानचे लष्कर हादरले आणि अखेर पाकिस्तानलाच युद्धबंदीची भीक मागावी लागली.Pakistan

    अफगाण माध्यमांच्या मते, पाकिस्तानी लढाऊ विमानांनी काबूल आणि स्पिन बोल्दाक भागात हवाई हल्ले केले. या हल्ल्यांत डझनभर नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. प्रत्युत्तरादाखल अफगाण सैन्याने पाकिस्तानातील पेशावरमध्ये ड्रोन हल्ला करून एका गुप्त प्लाझाला लक्ष्य केले, जेथे गुप्तचर कारवाया चालत असल्याचा दावा करण्यात आला आहे.Pakistan



    या थरारक घटनांनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला, मात्र शेवटी पाकिस्तानच्या विनंतीवरूनच ४८ तासांची युद्धबंदी लागू करण्यात आली.
    रॉयटर्सच्या माहितीनुसार, ही युद्धबंदी बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता (भारतीय वेळेनुसार) अमलात आली.

    तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी सांगितले की, “दुसऱ्या बाजूने उल्लंघन होत नाही तोपर्यंत अफगाण सैन्याने युद्धबंदीचे काटेकोर पालन करावे. ही युद्धबंदी पाकिस्तानच्या विनंतीवरच लागू करण्यात आली आहे.”

    अफगाण माध्यम टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, पाकिस्तानने सुरुवातीला दीर्घकाळ युद्धबंदीला मान्यता दिली होती, परंतु नंतर फक्त ४८ तासांची तात्पुरती युद्धबंदी जाहीर केली. अफगाण सूत्रांनी हे “करारभंग” असल्याचे म्हटले आहे.

    पाकिस्तानी लष्कराने दावा केला आहे की, कंधार प्रांतातील तालिबानच्या चौथ्या बटालियन आणि सहाव्या बॉर्डर ब्रिगेडचा पूर्ण नाश केला आहे.
    लष्कराचे प्रवक्ते म्हणाले, “आम्ही तालिबानच्या हल्ल्यांना ठिकाणांवर प्रत्युत्तर दिले. त्यांचे तळ उद्ध्वस्त झाले आहेत. आमचे सैन्य कोणत्याही हल्ल्याला तितक्याच जोमाने प्रत्युत्तर देईल.” तथापि, तालिबानने हे दावे फेटाळले असून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

    गेल्या आठवड्यापासून दोन्ही देशांमध्ये संघर्षाचे कारण तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) हा दहशतवादी गट आहे. सीमाभागात गोळीबार आणि हवाई कारवायांनी परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली आहे.

    Pakistan Humiliated! Pleads for Ceasefire After Afghan Airstrikes

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Kishtwar : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक जवान जखमी

    New York : न्यूयॉर्कच्या महापौर निवडणुकीत भारतवंशी ममदानी विजयी; 100 वर्षातील सर्वात तरुण आणि पहिले मुस्लिम महापौर

    Gopichand Hinduja : हिंदुजा समूहाचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांचे निधन; अनेक आठवड्यांपासून होते आजारी; जागतिक स्तरावर ग्रुपला बळकटी दिली