• Download App
    Pakistan Bombs Own Citizens पाकिस्तानकडून आपल्याच नागरिकांवर बॉम्बहल्ला; 30 ठार, अनेक घरे उद्ध्वस्त

    Pakistan : पाकिस्तानकडून आपल्याच नागरिकांवर बॉम्बहल्ला; 30 ठार, अनेक घरे उद्ध्वस्त

    Pakistan

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : Pakistan पाकिस्तानी हवाई दलाने रविवारी रात्री उशिरा खैबर पख्तूनख्वा प्रांतातील तिराह खोऱ्यातील मात्रे दारा गावावर हवाई हल्ला केला. चिनी बनावटीच्या जेएफ-१७ लढाऊ विमानांनी रात्री २ वाजता आठ लेसर-गाइडेड एलएस-६ बॉम्ब टाकले, ज्यामध्ये महिला आणि मुलांसह ३० हून अधिक नागरिक ठार झाले. अनेक गंभीर जखमी झाले आणि गावातील घरे उद्ध्वस्त झाली. लष्कराचा दावा आहे की या हल्ल्यात तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) च्या बॉम्ब-निर्मिती कारखान्याला लक्ष्य करण्यात आले. स्थानिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अमन गुल आणि मसूद खान हे दोन स्थानिक कमांडर गावात स्फोटके साठवत होते.Pakistan

    हल्ल्यादरम्यान स्फोटात जवळपासची घरे उद्ध्वस्त झाली. स्थानिक लोकांचा असा दावा आहे की मृत झालेले सर्व नागरिक होते आणि गावात कोणतेही दहशतवादी लपण्याचे ठिकाण नव्हते. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. अकाखेल जमातीने जाहीर केले आहे की ते मारले गेलेले पुरुष आणि मुले दफन करणार नाहीत, तर त्यांचे मृतदेह आर्मी कॉर्प्स कमांडरच्या घरासमोर ठेवून निषेध करतील. दरम्यान, पाकिस्तान मानवाधिकार आयोगाने हा हल्ला मानवतेविरुद्धचा गुन्हा असल्याचे म्हणत निष्पक्ष चौकशीची दोषींना शिक्षा देण्याची मागणी केली आहे.Pakistan



    खैबर पख्तूनख्वा प्रदेश का महत्त्वाचा आहे?

    या प्रदेशाला अफगाणिस्तान आणि दक्षिण आशियामधील “प्रवेशद्वार” म्हटले जाते. गझनी, बाबर आणि अहमद शाह अब्दालीसारखे आक्रमक या भागातून भारतात आले.

    पाकिस्तान निर्मितीनंतर येथील लोक अस्वस्थ

    १९४७ मध्ये पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा येथील पश्तूनांना स्वतंत्र पश्तूनिस्तान हवे होते, परंतु पाकिस्तानी सरकारने ऐकले नाही.

    विश्लेषकांच्या मते पाक लष्कर तालिबानच्या सापळ्यात अडकले आहे. “घरावर क्षेपणास्त्रे डागणे, हीच टीटीपीची इच्छा होती -नागरिकांचे मृत्यू.” येथील लोक आधीच लष्करप्रमुख असीम मुनीरवर संतापले आहेत कारण त्यांनी त्यांचा नेता इम्रान खान यांना तुरुंगात टाकले. या हल्ल्यामुळे त्यांचा राग आणखी भडकला आहे.

    Pakistan Bombs Own Citizens

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Kishtwar : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक जवान जखमी

    New York : न्यूयॉर्कच्या महापौर निवडणुकीत भारतवंशी ममदानी विजयी; 100 वर्षातील सर्वात तरुण आणि पहिले मुस्लिम महापौर

    Gopichand Hinduja : हिंदुजा समूहाचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांचे निधन; अनेक आठवड्यांपासून होते आजारी; जागतिक स्तरावर ग्रुपला बळकटी दिली