• Download App
    अफगणिस्तानकडे जुन्या चष्य्मातून पाहणे सोडून देणे गरजेचे – पाकिस्तानचा अनाहुत सल्ला |Pakistan bats for afghan

    अफगणिस्तानकडे जुन्या चष्य्मातून पाहणे सोडून देणे गरजेचे – पाकिस्तानचा अनाहुत सल्ला

    विशेष प्रतिनिधी

    इस्लामाबाद – युद्धग्रस्त अफगाणिस्तानची स्थिती बिकट बनली असली तरी जगाने त्याकडे जुन्या चष्म्यातून पाहणे सोडून द्यायला हवे आणि व्यावहारिक दृष्टीकोन बाळगून पुढे जायला हवे, असे मत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी मांडले आहे.Pakistan bats for afghan

    ते म्हणाले, की अफगाणिस्तानची स्थिती बिकट आहे. परंतु देशातील राजकीय परिस्थिती लवकरच स्थिर होईल आणि वातावरण सर्वसामान्य होईल. अफगाणिस्तानातील नवे वास्तव आपल्याला स्वीकारावी लागेल. जुन्या दृष्टीकोनातून पाहणे सोडून देणे गरजेचे असून व्यावहारिक दृष्टीकोन अंगिकारत पुढे जाण्याची गरज आहे. कुरेशी म्हणाले, की अफगाणिस्तानच्या नागरिकांचे कल्याण करणे हाच आपला मुळ उद्देश आहे. गेल्या चार दशकांपासून त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे.



    परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्राने म्हटले की, बैठकीत सहभागी झालेल्या देशांनी सीमा सुरक्षित राहण्यासाठी देशात शांतता प्रस्थापित करणे, अफगाणच्या भूमीतून दहशतवादाचा धोका कमी करणे, निर्वासितांना मायदेशी पाठवणे, आर्थिक स्थिरता आणि जीवनमान उंचावणे आणि तसेच दळणवळण वाढवण्यावर सहमती दर्शविली.

    Pakistan bats for afghan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या