लष्करी राजवटीच्या निषेधार्थ एकवटलेल्या लोकशाही समर्थकांना करण्यात आले लक्ष्य
विशेष प्रतिनिधी
सागांग: लष्करी राजवटीच्या निषेधार्थ एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकशाही समर्थकांवर म्यानमारच्या लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात अनेक मुलांसह १०० हून अधिक लोक मारले गेले. विशेष म्हणजे, आँग सान स्यू की यांच्या सरकारच्या सत्तापालटानंतर, त्यांच्या विरोधात सशस्त्र संघर्षाचा सामना करण्यासाठी लष्कर अधिकाधिक हवाई हल्ले करत आहे. Over 100 people including children killed in military airstrike on Myanmar village
ही मालिका २०२१ मध्ये सुरू झाली. तेव्हापासून लष्करी सैन्याने तब्बल तीन हजारांहून अधिक नागरिक मारले असल्याचा अंदाज आहे. सागांगमधील कम्युनिटी हॉलवर झालेल्या कथित हवाई हल्ल्यामुळे ते घाबरल्याचे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार प्रमुखांनी सांगितले आहे. तर यूएनचे प्रमुख वोल्कर तुर्क म्हणाले की, या कार्यक्रमात नृत्य करणाऱ्या शाळकरी मुलांसह इतर नागरिकही बळी पडले आहेत. घटनास्थळावरील आपत्कालीन कर्मचारी आणि शॅडो नॅशनल युनिटी सरकाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सागांग प्रदेशात झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये किमान ३० मुलांचा समावेश आहे.
सर्वत्र मृतदेह आणि शरीराचे तुकडे विखुरले –
बचाव कर्मचार्यांनी दक्षिणी सागांग प्रदेशातील पाजिगी गावात एक भयानक दृश्य वर्णन केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, लष्करी जेट आणि हेलिकॉप्टरच्या बॉम्बहल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचे शरीराचे अवयव दूरवर पसरले होते. सोशल मीडियावर शेअर केल्या जात असलेल्या गावाच्या फोटोंमध्ये डझनाहून अधिक जळालेले आणि विद्रुप मृतदेह दिसले, तर व्हिडिओंमध्ये एक नष्ट झालेली इमारत, जळलेल्या मोटारसायकली आणि ढिगारा दिसला.
लष्करी राजवटीच्या निषेधार्थ उघडण्यात आलेल्या प्रशासकीय कार्यालयाचा कार्यक्रम हे लष्कराच्या हवाई हल्ल्याचे लक्ष्य होते. लष्करी जेटच्या हवाई हल्ल्यानंतरच्या व्हिडिओ आणि छायाचित्रांमध्ये या इमारतीची फक्त जळलेला ढाचा दिसत आहे.
Over 100 people including children killed in military airstrike on Myanmar village
महत्वाच्या बातम्या
- अभिमानास्पद : भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
- पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पसरले हास्य; आतापर्यंत १.३ लाख कोटी रुपयांचे अदा करण्यात आले दावे
- ठाकरे – पवार सिल्वर ओकवर भेट; महाविकास आघाडीतील मतभेदांवर चर्चा की काही पॉलिटिकल सरप्राईज एलिमेंट??
- Karnataka election : भाजपाने १८९ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत ५२ नवीन नावं