• Download App
    दक्षिण कोरियाला अणुबॉम्बने नष्ट करण्याची धमकी; उत्तर कोरियाचा हुकूमशहाची बहिण किम यो जोंग |"outh Korea threatened to destroy by atomic bomb; Kim Yoo Jong, sister of the North Korean dictator

    दक्षिण कोरियाला अणुबॉम्बने नष्ट करण्याची धमकी; उत्तर कोरियाचा हुकूमशहाची बहिण किम यो जोंग

    वृत्तसंस्था

    सेऊल : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनची बहीण किम यो जोंग यांनी दक्षिण कोरियाला अणुबॉम्बने नष्ट करण्याची धमकी दिली आहे. किम यो जोंग म्हणाल्या की, जर दक्षिण कोरियाने लष्करी मुकाबला केला तर आमची न्यूक्लिअर कॉम्बॅट फोर्स आपले काम करेल.South Korea threatened to destroy by atomic bomb; Kim Yoo Jong, sister of the North Korean dictator

    हुकूमशहाच्या बहिणीने दक्षिण कोरियाचे संरक्षण प्रमुख सुह वूक यांची खिल्ली उडवली आणि म्हटले की उत्तर कोरियाविरुद्ध हल्ल्याबद्दल बोलणे ही त्यांची मोठी चूक होती. त्यांच्या सैन्याला आम्ही आमच्या दर्जाचे मानत नाहीत.खरं तर, दक्षिण कोरियाचे संरक्षण प्रमुख सुह वूक यांनी शुक्रवारी म्हटले होते की, आमच्याकडे उत्तर कोरियाच्या कोणत्याही लक्ष्यावर अचूक मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर किम यो जोंग यांनी प्रत्युत्तर दिले आहे.



    यो जोंग पुढे म्हणाल्या – अण्वस्त्रांचे पहिले काम देशाचे रक्षण करणे आहे, परंतु जर थेट लढा सुरू झाला तर त्यांचा वापर शत्रूच्या सैन्याला नष्ट करण्यासाठी केला जाईल. मग दक्षिण कोरियाच्या सैन्याचा भयंकर नाश होईल. हे टाळायचे असेल तर त्यांनी स्वतःला मर्यादेत ठेवायला हवे.

    outh Korea threatened to destroy by atomic bomb; Kim Yoo Jong, sister of the North Korean dictator.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Balochistan : बलुचिस्तानात रेल्वे रुळाजवळ आत्मघाती हल्ला, 24 मृत्यू; 82 जखमी; जाफर एक्सप्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले

    Marco Rubio : भारतीयांविरुद्ध वंशवादी टिप्पणीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री निराश; म्हटले- प्रत्येक देशात काही मूर्ख लोक असतात, ते अमेरिकेचे प्रतिनिधी नाहीत

    White House : व्हाइट हाऊसजवळ गोळीबार, ट्रम्प आत होते; सुरक्षा दलाच्या गोळीबारात संशयिताचा मृत्यू, महिन्यापूर्वी वार्ताहर डिनरमध्येही झाला होता गोळीबार