विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन: Donald Trump होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याबाबत करार करण्यासाठी इराणकडे फक्त 48 तास आहेत, नाहीतर त्यांना नरकयातना भोगाव्या लागतील, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी इराणला दिला आहे.Donald Trump
गेल्या अनेक 30 हून अधिक दिवसांपासून अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये जोरदार युद्ध सुरु आहे. याचा मोठा फटका जागतिक पातळीवर बसत आहे. अशामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याकाळात अनेक हेवेदावे केले आहेत. कधी त्यांनी होर्मुजच्या सामुद्रधुनीला ट्रम्पची सामुद्रधुनी म्हणून ओळखली जाणार असल्याची चर्चा सुरु असल्याचा दावा केला. कधी इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरु असल्याचे सांगितले. तर अलीकडेच आम्हाला होर्मुजच्या सामुद्रधुनीची गरज नसल्याचेही भाष्य केले.Donald Trump
असे ते म्हणाले. विशेष म्हणजे आतापर्यंत ट्रम्प यांनी इराणला होर्मुजची सामुद्रधुनी खुला करण्यासंदर्भात तीन वेगवेगळ्या प्रसंगी अंतिम इशारे दिले आहेत. इराणने तसे करण्यात अपयश आल्यास, त्यांच्या ऊर्जाविषयक पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.Donald Trump
डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटोचे वर्णन एक कमकुवत आणि अविश्वसनीय भागीदार असे केले आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये ते म्हणाले की, अमेरिका या आघाडीसोबतच्या आपल्या संबंधांचा फेरविचार करू शकते. तसेच त्यांनी यावेळी नमूद केले की, सध्याच्या परिस्थितीत नाटो आपल्या जबाबदाऱ्यांची पूर्णपणे पूर्तता करण्यात अपयशी ठरले आहे.
आतापर्यंत काय काय घडलं?
शुक्रवारी (3 एप्रिल) इराणने अमेरिकेची दोन लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला. यापैकी एक F-35 फायटर जेट आणि दुसरे A-10 अटॅक एअरक्राफ्ट आहे. पण अनेक माध्यमांमध्ये दावा केला जात आहे की, पडलेले पहिले फायटर जेट F-35 नसून F-15E आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प म्हटले की, इराणमध्ये अमेरिकन फायटर जेट पाडल्याच्या घटनेमुळे दोन्ही देशांमधील चर्चेवर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही युद्धात आहोत, असे म्हणत इशारा दिला आहे. असे असताना इराणने अमेरिकन फायटर जेटच्या वैमानिकाला पकडल्यास 10 अब्ज इराणी तोमान म्हणजेच 55 लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहे. इराणच्या सरकारी माध्यमाच्या एका निवेदकाने नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी अमेरिकन वैमानिकाला जिवंत पकडून सरकारी अधिकारी किंवा सैन्याकडे सोपवावे.
“Open Strait of Hormuz or Face Hell” – Donald Trump Warns Iran
महत्वाच्या बातम्या
- NCMC स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना एसटी बस प्रवासाचा डिजिटल लाभ!!
- Iranian Oil : भारताकडे येणारे इराणी तेल टँकर चीनकडे वळले; गुजरातजवळ मार्ग बदलला, पेमेंट वादाची शक्यता
- JD Vance : डोनाल्ड ट्रम्प यांनी जेडी वेंस यांना नवीन जबाबदारी दिली; फसवणूक प्रकरणांचे प्रभारी बनवले
- विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यायचा शरद पवारांचा शब्द; पण तरी ठाकरे विधान परिषदेत पोहोचणार का??