विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – ‘ओमिक्रॉन’चा प्रसार जगात वेगाने होत असला तरी कोरोना विषाणूचा हा प्रकार ‘डेल्टा’ या प्रकाराच्या तुलनेत कमी धोकादायक असल्याचे प्राथमिक अहवालावरून दिसून येत असल्याचे अमेरिकेच्या अध्यक्षांचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फॉसी यांनी सांगितले आहे.Omricon not dangerous than Delta
ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्यांमध्ये दिसून आलेली लक्षणे, त्यांची तीव्रता, रुग्ण गंभीर आजारी पडण्याचे प्रमाण याचा अभ्यास केला असता ओमिक्रॉन हा कमी धोकादायक असल्याचे दिसून आले आहे, असे डॉ. फॉसी यांनी सांगितले.
निश्चियत निष्कर्ष काढण्यासाठी आणखी अभ्यास आणि माहिती आवश्यंक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ओमिक्रॉन सर्वप्रथम आढळलेल्या दक्षिण आफ्रिकेत रुग्णालयात भरती होणाऱ्यांच्या संख्येत विशेष वाढ झाली नसल्याचे डॉ. फॉसी यांनी निदर्शनास आणून दिले.
Omricon not dangerous than Delta
महत्त्वाच्या बातम्या
- सर्वोच्च न्यायालयाचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना झटका, पेगॅसस प्रकरणी न्यायमूर्ती लोकूर आयोगामार्फत सुरु केलेल्या चौकशीला स्थगिती
- लोकशाही बुरख्यातले जामियायी “एक टर्मी” चिंतन…!!
- पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 डिसेंबरला गोव्यात; मुक्ती दिनाच्या 60 व्या वर्धापनाचा भव्य कार्यक्रम
- समीर वानखेडे यांची मुदत 31 डिसेंबरला संपणार; मुदतवाढ मागितली नाही; नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची माहिती