• Download App
    Now Britain also took the initiative to help Israel sent huge help with spy planes  marine commandos

    आता इस्रायलच्या मदतीसाठी ब्रिटनचाही पुढाकार, हेर विमानं, मरीन कमांडोंसह पाठवली मोठी मदत

    गरज भासल्यास रॉयल नेव्ही टास्क ग्रुप आणि रॉयल एअर फोर्सही मदतीसाठी इस्रायलला पोहोचणार असल्याचं पंतप्रधा ऋषी सुनक म्हणाले.

    विशेष प्रतिनिधी

    लंडन :  इस्रायल-हमास युद्ध सातव्या दिवशीही सुरूच आहे. अमेरिकेने भूमध्य समुद्रात शस्त्रास्त्रांनी सज्ज युद्धनौका आणि लढाऊ विमाने तैनात केल्यानंतर आता ब्रिटनही त्यात सामील झाला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी इस्रायलच्या मदतीसाठी एक हेर विमान, दोन युद्धनौका आणि तीन मर्लिन हेलिकॉप्टर व १०० रॉयल मरीन कमांडोजची एक कंपनी पाठवली आहे. Now Britain also took the initiative to help Israel sent huge help with spy planes  marine commandos

    आगामी काळात हे युद्ध आणखी भीषण रूप धारण करू शकते, हे यावरून दिसून येते. यासोबतच सुनक म्हणाले की, ते इस्रायलला मदत करण्यासाठी रॉयल नेव्ही टास्क ग्रुपही पाठवत आहेत. तथापि, ब्रिटनने पुनरुच्चार केला की हे युद्ध वाढण्यापासून रोखण्यास मदत करणे हा आपला उद्देश आहे.

    गार्डियनच्या अहवालानुसार, ब्रिटनच्या लष्करी मदतीमध्ये P8 विमाने, सर्विलांस एसेट्स, दोन रॉयल नेव्ही जहाजे – RFA Lime Bay आणि RFA Argus, तीन मर्लिन हेलिकॉप्टर आणि रॉयल मरीन कमांडोजची एक कंपनी यांचा समावेश आहे.

    कोणत्याही परिस्थितीत इस्रायलसाठी ही मदत  भूमध्य समुद्रात स्टँडबाय मोडमध्ये तैनात केली जाईल. सुनक म्हणाले की, आमचे जागतिक दर्जाचे सैन्य इस्रायलच्या समर्थनासाठी नेहमीच एकत्र उभे असते. क्षेत्रीय  समतोल राखण्यासाठी हे केले जात आहे. विरोध आणि हल्ले थांबवले पाहिजे.

    आमचा इस्रायलला पूर्ण पाठिंबा असल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान म्हणाले आहेत. हमासच्या दहशतवाद्यांचे हल्ले थांबलेच पाहिजेत, जर त्यांनी तसे स्वतः केले नाही तर त्यांचा नाश निश्चित आहे. ज्या प्रकारचा भीषण दहशतवादी हल्ला झाला तो योग्य नव्हता. आम्ही इस्रायलची साथ सोडणार नाही. गरज भासल्यास रॉयल नेव्ही टास्क ग्रुप आणि रॉयल एअर फोर्सही मदतीसाठी इस्रायलला पोहोचतील.

    Now Britain also took the initiative to help Israel sent huge help with spy planes  marine commandos

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या