विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क – अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे चौकशीनंतर उघड झाल्यावर न्यूयॉक राज्याचे गव्हर्नर अँड्य्रू कुओमो यांना राजीनामा द्यावा लागला आहे. कुओमो यांनी राजीनामा दिला असला तरी आरोप अमान्य केले आहेत.
त्यांच्यानंतर कॅथी हॉकुल यांच्याकडे गव्हर्नरपदाची जबाबदारी येणार असून त्या न्यूयॉर्कच्या पहिल्या महिला गव्हर्नर ठरणार आहेत. गैरप्रकाराचा आरोप झाल्यावरून पद सोडावे लागलेले कुमोओ हे न्यूयॉर्कचे सलग तिसरे गव्हर्नर ठरले आहेत.
कुमोओ यांच्यानंतर गव्हर्नरपदाची जबाबदारी एका महिलेवर येणे ही महत्वाची बाब मानली जाते. अमेरिकेच्या संसदीय राजकारणात गव्हर्नरपदाला विशेष महत्व आहे. अमेरिकेच बहुतांश अध्यक्ष हे त्या पदावर निवडून येण्याआधी कोणत्या ना कोणत्या प्रांताचे गव्हर्नर झालेलेच असतात.
त्यातही जेथे संयुक्त राष्ट्रसंघाचे कार्यालय आहे तसेच जे शहर अमेरिकेतील फार महत्वाचे शहर मानले जाते अशा शहराच्या गव्हर्नर या पद्धतीन नामुष्कीने पदावरून जावे लागणे हा अमेरिकेच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सेक्स गुलाम बनविण्यासाठी तालीबान अफगणिस्थानातील घराघरात मुली आणि विधवांचा घेतेय शोध
- अभिनेते प्रशांत दामले राज्य सरकारवर संतप्त, मोगॅँबो खुश हुआ म्हणत हॉटेल-मॉल्स मालकांचे अभिनंदन करत साधला निशाणा
- शिक्षणसम्राट मंत्र्यांना सामान्यांपेक्षा आपल्या संस्थांचीच काळजी, १५ टक्के फी कपातीवरून मंत्रीमंडळ बैठकीत खडाजंगी
- Maharashtra Unlock : 15 ऑगस्टपासून लॉकडाऊन मधून ‘स्वातंत्र्य’; टास्क फोर्सचा शाळा, महाविद्यालयं सुरू करण्यास विरोध