विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क – इडा चक्रीवादळामुळे अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहर आणि न्यू जर्सी येथे मुसळधार पाऊस झाला असून निम्मे शहर पाण्य़ाखाली गेले आहे. त्यामुळे किमान ४५ हून अधिक जणांचे बळी गेले आहेत. न्यूयॉर्क शहरात विक्रमी पाऊस पडत असून महापूर आला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिक बिकट स्थितीचा सामना करत आहोत. New York and newjersy collapsed due to rain and flood
न्यूयॉर्क शहर आणि प्रांताच्या अन्य भागात इडा चक्रीवादळामुळे आणीबाणी घोषित करण्यात आली. सब वे स्थानक आणि रुळावर पाणी साचल्याने मेट्रोपॉलिटन ट्रान्स्पोर्टेशन ॲथोरिटीने सर्व सेवा स्थगित केल्या. सोशल मीडियावर शहरात शिरलेल्या पाण्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
यात शहरातील प्रमुख मार्गावर उभ्या असलेल्या गाड्या खिडक्यापर्यंत बुडल्याचे दिसते. रस्त्याला तलावाचे रूप धारण केले आहे. मुसळधार पाऊस आणि पूर असताना न्यूजर्सीच्या ग्लूसेस्टर कौंटीत कौंटीला चक्रीवादळाचे संकट आहे.या भागातील शेकडो घरांची हानी झाली आहे. चोहोबाजूला पाणी साचले असून मेट्रो स्थानकातून झरे वाहत आहेत.
New York and newjersy collapsed due to rain and flood
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनामुळे मृत्यूवर भरपाईचे धोरण नसल्याने केंद्राला फटकारले, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले- ‘तुम्ही काही करेपर्यंत तिसरी लाटही निघून जाईल’
- न्यूझीलंडमध्ये दहशतवादी हल्ला : इसिसच्या जिहादीने 6 जणांना चाकूने भोसकले, 3 जण गंभीर; पोलिसांच्या गोळीबारात हल्लेखोर ठार
- काबूलमध्ये ‘तालिबान सरकार’ स्थापनेचे होर्डिंग्ज, हक्कानी नेटवर्कलाही सत्तेत स्थान, मुल्ला बरादर करणार नेतृत्व