• Download App
    कोरोनाचा संसर्ग हा हंगामी स्वरूपाचा , स्पेनमधील संशोधकांचा दावा|New study on corona virus in spain

    कोरोनाचा संसर्ग हा हंगामी स्वरूपाचा , स्पेनमधील संशोधकांचा दावा

    विशेष प्रतिनिधी

    लंडन – कमी तापमान आणि आर्द्रतेशी संबंध असलेला कोरोनाचा संसर्ग हा हंगामी स्वरूपाचा व साधारण हंगामी एन्फ्लुएन्झासारखा आहे, याचे नवे ठोस पुरावे आढळल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
    स्पेनमधील ‘बार्सिलोना इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ’ (आयएसग्लोबल)मधील संशोधकांच्या चमूने यावर संशोधन केले आहे.New study on corona virus in spain

    त्यावरील अभ्यास लेख ‘नेचर कॉम्प्युटेशनल सायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. हवेतून प्रसार पावणाऱ्या ‘सार्स-सीओव्ही-२’ या आजारातही या अभ्यासातील निष्कर्ष लागू होतात. यामुळे स्वच्छ हवेच्या उपायावर भर देऊन त्याविषयी जागृती करण्याच्या गरजेवरही भर द्यायला हवा, असेही यात म्हटले आहे.



    एन्फ्लुएन्झाप्रमाणे ‘सार्स-सीओव्ही-२’ ची वाटचाल हंगामी विषाणूसारखी होत आहे का किंवा वर्षातील कोणत्याही काळात त्याचा संसर्ग पसरतो, असे प्रश्नच अनेकदा उपस्थित होतात, याची नोंद या संशोधनात घेतली आहे. पहिल्या सैद्धांतिक प्रारूप अभ्यासानुसार कोरोनाच्या संसर्गाला हवामान कारणीभूत नाही, असे निष्कर्ष मांडण्यात आला आहे.

    यासाठी विषाणूविरोधी प्रतिकारशक्ती नसलेल्या संवेदनक्षम व्यक्तींचे दाखले देण्यायत आले.कोरोनामुळे मानवी शरीरात बदल होण्यापूर्वी व सार्वजनिक आरोग्यी धोरण ठरविण्यापूर्वी पहिल्या टप्प्यात पाच खंडांमधील १६२ देशांमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूचा अभ्यास करताना तापमान व आद्रता यांच्या संबंधाने संशोधकांनी विश्लेचषण केले.

    त्यात जागतिक पातळीवर कोरोना संसर्गाचा वेग आणि तापमान, आद्रता यांचा काही संबंध नसल्याचे आढळले. कमी तापमान आणि आद्रतेत संसर्गाचा वेग वाढत असल्याचे दिसून आले, असे संशोधकांनी सांगितले.

    New study on corona virus in spain

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    France Returns King Toera : फ्रान्सने मादागास्करच्या राजाची कवटी परत केली; 128 वर्षांपूर्वी शिरच्छेद करून फ्रेंच सैनिकांनी नेली होती

    America : अमेरिका रशियासोबत व्यापार करू इच्छिते; बंदी उठवण्याचा विचार; रशियन अणुऊर्जा जहाजे खरेदी करण्याची तयारीही

    Trump : ट्रम्प यांची चीनवर 200% टॅरिफची धमकी; म्हणाले- माझ्याकडे असे कार्ड आहेत, ते उघडले तर चीन नष्ट होईल