• Download App
    न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर मुस्लिमांचा नमाज; मशिदीतच प्रार्थना करण्याचा अनेकांचा सल्ला|Muslim prayers in New York's Times Square; Many advise to pray in the mosque

    न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर मुस्लिमांचा नमाज; मशिदीतच प्रार्थना करण्याचा अनेकांचा सल्ला

    वृत्तसंस्था

    न्यूयॉर्क : अमेरिकेच्या न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर मुस्लिमांनी नमाज अदा केली. यावेळी हजारो मुस्लिम जमा झाले. तरावीहची नमाज पठण करण्यात आली. मुस्लिमांनी रस्त्यावरच नमाज अदा केल्याने सोशल मीडियावर अनेकांनी नमाज हा मशिदीत अदा करण्याच्या सल्ला दिला आहे. Muslim prayers in New York’s Times Square; Many advise to pray in the mosque

    इस्लाम शांतीचा धर्म गल्फ टुडेच्या वृत्तानुसार – नमाज कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितले की, अमेरिकेत राहणाऱ्या मुस्लिमांना न्यूयॉर्कमध्ये रमजानचा सण साजरा व्हावा आणि इस्लाम हा शांतीचा धर्म असल्याचा संदेश लोकांना द्यायचा आहे. इस्लामबद्दल जगात गैरसमज आहेत.



    रस्त्यावर प्रदर्शन कशाला ?

    नमाज रस्त्यावर अदा करून प्रदर्शन कशाला करता ? अशी टीका सोशल मीडियावर अनेकांनी केली आहे. नमाज हा मशिदींमध्येच केला पाहिजे. UAE चा रहिवासी हसन सजवानी म्हणाला – लोकांना रस्त्यावर नमाज अदा केल्याने समस्यांना सामोरे जावे लागते. एकट्या न्यूयॉर्कमध्ये २७० हून अधिक मशिदी आहेत, ज्या नमाजासाठी सर्वोत्तम ठिकाणे आहेत. धर्माचे प्रदर्शन करण्यासाठी लोकांचा मार्ग अडवण्याची गरज नाही. इस्लाम आपल्याला असे शिकवत नाही.

    आणखी एका युजरने असेही लिहिले – मी मुस्लिम आहे पण टाईम्स स्क्वेअरवर नमाज अदा करण्याचे समर्थन करत नाही. इस्लाम हा ‘आक्रमक’ किंवा घुसखोर आहे असा चुकीचा संदेश यातून दिला जाऊ शकतो. त्यामुळे नमाज फक्त मशिदीतच अदा करा.

    Muslim prayers in New York’s Times Square; Many advise to pray in the mosque

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सिंगापूर-हाँगकाँगनंतर आता अमेरिकेत MDH आणि एव्हरेस्टची मसाल्यांची तपासणी; यूएस फूड रेग्युलेटर करतेय पडताळणी

    पाकिस्तानने म्हटले- भारतीय नेत्यांनी निवडणुकीत आमचा वापर करू नये; राजकारणासाठी मुद्दा करत आहेत

    US पोलिसांनी कृष्णवर्णीयाचा गळा दाबला, रुग्णालयात मृत्यू; श्वास गुदमरल्याचे सांगत होता, पोलिसांनी पाय काढलाच नाही