विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – अमेरिकेच्या ऐतिहासिक ‘अपोलो ११’ या चांद्रमोहिमेत नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन यांच्याबरोबरच अवकाश यानातील तिसरे अवकाशवीर असलेले मायकेल कॉलिन्स (वय ९०) यांचे कर्करोगाने निधन झाले. १९६९ मधील ऐतिहासीक मोहिमेत आर्मस्ट्राँग आणि ऑल्ड्रिन यांनी चंद्रावर पाऊल ठेवले होते, तर कॉलिन्स यांनी अवकाशयानात बसून इतर तांत्रिक जबाबदारी सांभाळली होती. Micel collins pass away apolo mission
‘अपोलो ११’ या जगप्रसिद्ध मोहिमेदरम्यान चंद्रापर्यंत जाण्यासाठी कॉलिन्स यांनी दोन लाख ३८ हजार किलोमीटरचा अवकाशप्रवास केला असला तरी त्यांना चंद्रावर पाऊल ठेवण्याची संधी मिळाली नाही. मात्र, याचे त्यांना अजिबात दु:ख वाटत नव्हते. त्यांनीच अवकाश यानाचे संचालन केले होते.
इतर दोघे अवकाशवीर चंद्रावर उतरल्यानंतर कॉलिन्स हे २८ तास एकटेच अवकाशयानात होते. कॉलिन्स यांनी तांत्रिक बाजू उत्तमरित्या सांभाळली नसती तर आर्मस्ट्राँग आणि ऑल्ड्रिन हे दोघे चंद्रावरच अडकून पडले असते. मोहिमेतील नील आर्मस्ट्राँग यांचे २०१२ मध्ये निधन झाले.
Micel collins pass away apolo mission
महत्वाच्या बातम्या
- Exit Polls Results 2021 LIVE On The Focus India : आसाम, पुदच्चेरी भाजपकडे, तमिळनाडू द्रमुककडे, केरळ डाव्यांकडे.. पण बंगालमध्ये गौडबंगाल!
- West Bengal The Focus India Exit Poll Results 2021 : पश्चिम बंगालमध्ये सस्पेन्सच… अगदी एक्झिट पोल्स देखील दुभंगलेले! कोणाला काटावरचे बहुमत? की त्रिशंकू विधानसभा?
- Tamil Nadu The Focus India Exit Poll Results 2021 : तमिळनाडूत द्रमुकचा आवाज; स्टॅलिन नवे करूणानिधी
- Assam The Focus India Exit Poll Results 2021 : आसाममध्ये पुन्हा कमळ फुलणार भाजप आघाडीचा काँग्रेसला झटका
- Kerala The Focus India Exit Poll Results 2021 : केरळमध्ये पुन्हा डावी लोकशाही आघाडी सत्तेवर येण्याचा अंदाज
- Puducherry The Focus India Exit Poll Results 2021 : केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीत भाजपची बाजी ; कमळ फुलणार ; काँग्रेसचे स्वप्न भंगणार