• Download App
    तालीबान सत्तेवर आल्याने भारतातील अनेकांना फुटू लागल्या आनंदाच्या उकळ्या, इम्रान खान यांचीच भाषा समाजवादी पक्षाचेही नेते बोलू लागले Many in India were overjoyed when the Taliban came to power, Samajwadi Party leaders also started speaking Imran Khan's language

    तालीबान सत्तेवर आल्याने भारतातील अनेकांना फुटू लागल्या आनंदाच्या उकळ्या, इम्रान खान यांचीच भाषा समाजवादी पक्षाचेही नेते बोलू लागले

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा घेतल्यामुळे भारतातही अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या आहेत. समाज वादी पक्षातील अनेक नेते हिंसक तालिबानच्या कारवाईच्या समर्थनात वक्तव्य करून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचीच भाषा बोलत आहेत. Many in India were overjoyed when the Taliban came to power, Samajwadi Party leaders also started speaking Imran Khan’s language

    समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर रहमान बर्क यांनी अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांची लढाई ही स्वातंत्र्यासाठी आहे, अशी मुक्ताफळं बर्क यांनी उधळली आहेत. तालिबान अफगाण नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी लढाई लढत आहे. अफागाणिस्तानचे स्वातंत्र्य हा त्यांचा मुद्दा आहे. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे राज्य का आहे? तालिबान तिथली एक शक्ती आहे आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांना त्यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्य हवे आहे, असं बर्क म्हणाले.



    उत्तर प्रेदशातील प्रादेशिक पक्ष असलेल्या पीस पक्षाचे प्रवक्ते शादाब चौहान यांनीही तालिबानचे समर्थन केले आहे. अमेरिका आणि तालिबानमध्ये शाततेसाठी चर्चा सुरू होती तेव्हा भारताचाही प्रतिनिधी तिथे होता. भारत सरकारने त्यावेळी विरोध केला नाही. मग आपल्या शेजारी देशात स्थापन होत असलेल्या सरकारशी का शत्रुत्व घ्यायचं, असं शादाब चौहान म्हणाले.

    पीस पक्षाचे नेते फैज अहमद फैज यांनीही सुरात सूर मिळवला. अफगाणिस्तानमध्ये सत्ता परिवर्तन नाही, व्यवस्था परिवर्तन झाले आहे. आपल्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा जगातील प्रत्येक नागरिकाला हा अधिकार आहे, असं फैज म्हणाले.

    तालिबानला समर्थन देणाऱ्यांमध्ये जामियाचा ‘विद्यार्थी’ आणि दिल्ली दंग्याचा आरोपी आसिफ इकबाल तन्हा चाही यात समावेश आहे. इकबाल आणि त्याच्या काही साथीदारांनी तालिबानी राजवट आल्यावर आनंद व्यक्त केला होता.

    विशेष म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तालिबानी सत्तेचे स्वागत केले आहे. अफगाणिस्तानने गुलामीचे जोखड फेकून दिले असल्याचे त्यांनी म्हटले. भारतातील काही जण त्यांचीच भाषा बोलू लागले आहेत.

    Many in India were overjoyed when the Taliban came to power, Samajwadi Party leaders also started speaking Imran Khan’s language

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या