विशेष प्रतिनिधी
टोकियो : जपानमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेने धडक मारली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा संपूर्णपणे कोलमडून पडली आहे. चौथ्या लाटेत नागरिकांचा घरातच मृत्यू होत असल्याचे दुर्दैवी चित्र पाहावयास मिळत आहे.Japan facing forth wave of corona
जपानचे सरकार हतबल झाले असून नागरिकांचा संताप वाढत चालला आहे. बाधितांच्या संख्येच्या तुलनेत बेडची संख्या अपुरी पडू लागली आहे.ओसाका प्रांतात दोन महिन्यात १७ जणांचा घरातच मृत्यू झाला आहे.
त्यांच्यात कोरोनाचे विषाणू आढळून आले आहेत. या रुग्णांना दवाखान्यात दाखल का केले नाही, याचे स्पष्टीकरण ओसाका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देता आले नाही. देशातील बहुतांश रुग्णालये भरलेली असून कोरोनाबाधित आणि गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना नाविलाजाने घरातच राहावे लागत आहे.
काल ओसाका येथे चोवीस तासात कोरोनाचे ९७४ रुग्ण आढळून आले तर टोकियोत हीच संख्या १०१० होती. गेल्या शुक्रवारी ओसाका नर्सिंग होममध्ये ६१ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यापैकी भरतीसाठी वाट पाहणाऱ्या चौदा जणांचा मृत्यू झाला.
जपानमध्ये केवळ एकच टक्के लसीकरण झाले आहे. तरीही ऑलिंपिक स्पर्धा सुरक्षितपणे पार पाडल्या जातील, असे पंतप्रधान सुगा सांगत आहेत. त्यामुळे खासदारांत नाराजी आणि संभ्रम निर्माण झाला आहे.
काल जपानमध्ये अनेक ठिकाणी आणीबाणी लागू करण्यात आली. देशातील कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याचे पाहून तीन लाखाहून अधिक नागरिकांनी एका याचिकेवर हस्ताक्षर करून टोकियो ऑलिंपिक रद्द करण्याची मागणी केली आहे.
Japan facing forth wave of corona
महत्त्वाच्या बातम्या
- सिरमने कोविशिल्डच्या दोन लशींमधील अंतर वाढवले, आता १२ ते १६ आठवड्यांनी घ्या दुसरा डोस
- लस, ऑक्सिजनप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही झाले गायब, राहुल गांधी यांची टीका
- आठवडाभरात रशियाची स्पुटनिक लस भारतीयांना मिळणारल लसीकरणाला येणार वेग
- ठाकरे- पवार सरकार झोपलेलेच; तिकडे मराठा आरक्षणाबाबत केंद्राची फेरविचार याचिका! राज्यांचा अधिकार अबाधित असल्याचे प्रतिपादन
- लक्षद्वीपजवळ चक्रीवादळ घोंगावतेय ; कोंकण किनारपट्टीवर तशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहणार ; जोरदार पावसाची शक्यता
- Guru Ravi Shankar Biopic : श्री श्री रविशंकर यांच्या जीवनावर आता लवकरच बायोपिक