• Download App
    उत्तर प्रदेशात योगींची ताकद वाढणार, सात छोटे पक्ष आता भाजपच्या बाजूने |Isha Ambani elected on Smithsonium Musiuam

    अमेरिकेतील जगप्रसिद्ध ‘स्मिथसोनियन म्युझियम’ च्या मंडळावर ईशा अंबानी यांची नियुक्ती

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन – वॉशिंग्टन डीसी येथील ‘स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्ट’च्या बोर्डावर ईशा अंबानीची नियुक्ती करण्यात आली. ईशा अंबानी या बोर्डाच्या सर्वात तरुण सदस्य आहेत. त्यांची बोर्डावर ४ वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.Isha Ambani elected on Smithsonium Musiuam

    त्यांनी येल युनिव्हर्सिटी आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मधून पदव्या घेतल्या आहेत आणि न्यूयॉर्क शहरातील मॅकिन्से अँड कंपनीमध्ये व्यवसाय विश्लेषक म्हणून काम केले आहे.ईशा अंबानीशिवाय कॅरोलिन ब्रेहम आणि पीटर किमेलमन यांचीही बोर्डावर नियुक्ती करण्यात आली आहे.



    १७ सदस्यीय मंडळात अमेरिकेचे उपाध्यक्ष, अमेरिकेचे मुख्य न्यायाधीश, अमेरिकी सिनेटचे तीन सदस्य आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे तीन सदस्य असतात. ‘स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्ट’च्या निवेदनात ईशा अंबानीच्या व्यक्तिमत्त्वाचा संदर्भ देत भारतातील डिजिटल क्रांतीचे नेते म्हणून त्यांचे वर्णन केले आहे. त्या रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या संचालक आहेत. जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक आणणाऱ्या टीमचा ती एक भाग होती. ज्याने फेसबुकचा ५.७ अब्ज डॉलरचा करार केला.

    Isha Ambani elected on Smithsonium Musiuam

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या