• Download App
    भारतीय वंशाचे ऋषी सुनक बनणार ब्रिटनचे पंतप्रधान, राजीनाम्यासाठी बोरिस जॉन्सन यांच्यावर दबाव|Indian descent rushi Sunak will be Prime Minister of Britain; Pressure on Boris Johnson to resign

    भारतीय वंशाचे ऋषी सुनक बनणार ब्रिटनचे पंतप्रधान, राजीनाम्यासाठी बोरिस जॉन्सन यांच्यावर दबाव

    वृत्तसंस्था

    लंडन : भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान बनण्याची शक्यता वाढली आहे. कारण पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लॉकडाऊन असताना गेल्या वर्षी एका पार्टीत भाग घेतल्याने त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढल्याची चर्चा सूरु आहे.Indian descent rushi Sunak will be Prime Minister of Britain; Pressure on Boris Johnson to resign

    बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षातील नेते व विरोधकांनी केला. त्यामुळे बोरिस यांना पायउतार व्हावे लागले तर ऋषी सुनक पंतप्रधानपद बनू शकतात.



    इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे ऋषी हे जावई असून ब्रिटनचे अर्थमंत्री आहेत. २०२० मध्ये लॉकडाऊनमध्ये पंतप्रधान बोरिस जॉन्सन एका पार्टीमध्ये सामील झाले होते. ही पार्टी पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर लॉकडाऊनच्या नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला.

    कोण आहेत ऋषी सुनक

    मुळचे पंजाबचे असलेले ऋषी सुनक यांनी विचेंस्टर कॉलेजमधून आणि त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातून उच्चशिक्षण घेतले. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी एमबीए केले आहे.

    त्यांनी ग्लोडमन सॅक्स, हेज फंड येथे काम केले होते. नंतर इन्व्हेस्टमेंट कंपनी सुरू केली. त्यांच्या कुटुंबाला वैद्यकीय वारसा लाभला आहे. वडील डॉक्टर तर आई फार्मासिस्ट होती.

    Indian descent rushi Sunak will be Prime Minister of Britain; Pressure on Boris Johnson to resign

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Saudi Arabia : सौदी अरेबियातील रस्ते अपघातात 45 भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस आणि डिझेल टँकरची धडक

    Sheikh Hasina, : शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; बांगलादेश कोर्टाने विद्यार्थ्यांच्या हत्येचे दोषी मानले; युनूस म्हणाले- भारताने शेख हसीना यांना सोपवावे

    Tariff India : अमेरिकेत महागाई वाढताच ट्रम्प यांना उपरती, भारतातील चहा-कॉफी आणि मसाल्यांवरील 50% टॅरिफ हटवला