• Download App
    अफगाणिस्तानला 20 हजार मेट्रिक टन गहू पाठवणार भारत, इराणच्या चाबहार बंदराचा करणार वापर|India will use Iran's Chabahar port to send 20,000 metric tons of wheat to Afghanistan

    अफगाणिस्तानला 20 हजार मेट्रिक टन गहू पाठवणार भारत, इराणच्या चाबहार बंदराचा करणार वापर

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र जागतिक अन्न कार्यक्रम (UNWFP) च्या भागीदारीत अफगाणिस्तानला 20,000 मेट्रिक टन गहू पाठवण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी दिल्लीत भारताच्या मध्य आशियातील संयुक्त कार्यगटाच्या (JWG) पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे ही मदत काबूलला पाकिस्तानमार्गे नाही, तर इराणच्या चाबहार बंदरातून पाठवली जाणार आहे.India will use Iran’s Chabahar port to send 20,000 metric tons of wheat to Afghanistan

    भारत आणि मध्य आशियातील 5 देशांदरम्यान मंगळवारी अफगाणिस्तानातील परिस्थितीवरही चर्चा झाली. यादरम्यान अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कारवायांच्या नियोजनासाठी होऊ नये, यावर भर देण्यात आला. दरम्यान, अफगाणिस्तानच्या मदतीसाठी इराणमार्गे गव्हाची खेप पाठवली जाईल, असेही ठरले.



    भारतासह 6 देशांचा बैठकीत सहभाग

    JWGची बैठक मंगळवारी भारतात झाली. यात कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानचे विशेष दूत आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. UNWFP आणि युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राइम्स (UNODC) मधील देशांचे प्रतिनिधीदेखील यात सहभागी झाले होते.

    सर्व देशांचे संयुक्त निवेदन

    बैठकीनंतर JWG ने एक संयुक्त निवेदनही जारी केले. सर्व अफगाण लोकांच्या हक्कांचा आदर करणारी आणि शिक्षणासह महिला, मुली आणि अल्पसंख्याक गटांच्या सदस्यांसाठी समान हक्क सुनिश्चित करणारी सर्वसमावेशक आणि प्रातिनिधिक राजकीय संरचना तयार करण्याच्या महत्त्वावर या बैठकीत भर देण्यात आला.

    निवेदनात पुढे म्हटले आहे की, अधिकार्‍यांनी दहशतवाद, अतिरेकी, कट्टरतावाद आणि अंमली पदार्थांची तस्करी या क्षेत्रीय धोक्यांवर चर्चा केली आणि या धोक्यांचा सामना करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांच्या शक्यताही पाहिल्या.

    भारताचे अफगाणिस्तानला 50 हजार मेट्रिक टन गहू देण्याचे आश्वासन

    अफगाणिस्तानात सत्तापालट झाल्यानंतर उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली होती. भारताने अफगाणिस्तानचे नागरिक आणि सरकारकडे मैत्रीचा हात पुढे केला होता. भारताने गेल्या वर्षी आश्वासन दिले होते की ते अफगाणिस्तानला 50 हजार मेट्रिक टन गव्हाची खेप पाठवतील. भारताने 36,500 मेट्रिक टन गहू पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानला पाठवला आहे.

    भारत-अफगाणिस्तान संबंधांमध्ये सुधारणा

    तालिबान सत्तेवर आल्यानंतर भारत-अफगाणिस्तान संबंधांबद्दल सर्वांनाच काळजी वाटत होती, परंतु 50,000 मेट्रिक टन गव्हाच्या पहिल्या आश्वासनानंतर दोन्ही देशांमधील संबंध सुधारत आहेत. जवळपास 10 महिन्यांपासून बंद असलेले अफगाणिस्तानमधील दूतावासही भारताने पुन्हा सुरू केले आहे.

    India will use Iran’s Chabahar port to send 20,000 metric tons of wheat to Afghanistan

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    American Pope : नवीन पोपची घोषणा झाली, रॉबर्ट प्रीव्होस्ट सर्वात मोठे ख्रिश्चन धर्मगुरू, पहिले अमेरिकी पोप

    Pakistan PM : ऑपरेशन सिंदूरनंतर पाक पंतप्रधानांचा जळफळाट- आम्ही बदला घेऊ; संसदेत 5 भारतीय विमाने पाडल्याचा दावा

    Donald Trump : ट्रम्प यांनी UNची 19 हजार कोटींची मदत रोखली; 3000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना