विशेष प्रतिनिधी
काबूल : अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर तयार होणाऱ्या अफगाणिस्तानच्या नव्या रचनेत तालिबान्यांचे महत्त्व लक्षात घेता भारताने त्यांच्याशी बोलणी करण्यास सुरुवात केली असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. .India will talk with Taliban
देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्या सल्ल्यानेच भारताचे प्रतिनिधी तालिबान्यांना भेटल्याचे बोलले जात आहे. सध्या तालिबानवर कोणत्याही प्रकारची बंधने नसल्याने भारताने चर्चेसाठी पुढाकार घेतला आहे. सध्या भारत अफगाणिस्तान सरकारशी वाटाघाटी करत असला तरीसुद्धा परिस्थिती बदलली तर तालिबान्यांशी देखील वाटाघाटी करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
अफगाणिस्तानातील शांती प्रक्रियेमध्ये कतारचे नेतृत्व सक्रिय असल्याने भारताने त्यांच्याशी बोलणीसाठी पुढाकार घेतला आहे. कतारच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसोबत देखील भारताने चर्चा केल्याचे समजते.
सध्या तालिबान हा अफगाणिस्तानातील महत्त्वाचा घटक असून भविष्यात त्याचे महत्त्व आणखी वाढणार आहे. अफगाणिस्तानातील तिढ्यावर शांततेच्या मार्गाने ठोस तोडगा काढण्यासाठी सर्व बाजूंनी एकत्र येणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
India will talk with Taliban
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्र सरकार करणार खर्चात काटकसर, हवाई प्रवास, बैठकांतील चहा, नाष्टयाचा खर्च होणार कमी
- नीरव मोदीला भारतात आणणारच, ब्रिटन न्यायालयाने प्रत्यार्पणाचा विरोध करणारी याचिका फेटाळली
- उत्तर प्रदेशात निवडणुकांमुळे कोरोना वाढला, मग महाराष्ट्रात कोणत्या निवडणुका होत्या? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा सवाल
- बांताक्रुझ ! नवी मुंबई विमानतळाच्या नावासाठी आणखी एक प्रस्ताव, तणाव कमी करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पूरी यांचा संता- बांता जोकचा आधार
- काय शिजतंय? शरद पवार- प्रशांत किशोर यांच्यात एक तास बंद खोलीत चर्चा