• Download App
    जागतिक पातळीवर कोरोना प्रतिबंधक लशींचे असमान वाटप, भारताकडून चिंता व्यक्त|India warns world regarding vaccine distribution

    जागतिक पातळीवर कोरोना प्रतिबंधक लशींचे असमान वाटप, भारताकडून चिंता व्यक्त

     

    न्यूयॉर्क – कोरोना संसर्गाची परिस्थिती जगात सर्वत्र कायम असतानाही जागतिक पातळीवर कोरोना प्रतिबंधक लशींचे मात्र असमान वाटप होत असल्याबद्दल भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये नाराजी व्यक्त केली. तसेच, को-विन ॲपही जगाला देण्याची तयारी भारताने दर्शविली आहे.India warns world regarding vaccine distribution

    जगभरातील कोरोना स्थितीवर आज संयुक्त राष्ट्रांमध्ये चर्चा झाली. भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी भारताची भूमिका मांडली. ‘लसीकरणातील असमानता दूर करण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबविणे आवश्यीक आहे.



    कोरोना विषाणूचे आणखी उत्परिवर्तन रोखण्यासाठी लसीकरणाला वेग आणणे अत्यावश्य क आहे. जागतिक सार्वजनिक आरोग्यासाठी आम्ही आमचे को-विन तंत्रज्ञान जगाला देण्यास तयार आहोत,’ असे तिरुमूर्ती म्हणाले.

    ऑगस्ट महिन्यात सुरक्षा समितीचे अध्यक्षपद भारताकडे आहे. त्या पार्श्वभूमीवर तिरुमूर्ती यांनी सागरी सुरक्षेचा मुद्दाही मांडला. सर्वांच्या समृद्धीसाठी सागरी सुरक्षेकडे सर्वच देशांनी लक्ष देणे आवश्यीक असल्याचे ते म्हणाले.

    पुढील महिन्यात सुरक्षा समितीमध्ये सागरी सुरक्षा, शांतता मोहिमा आणि दहशतवादविरोध या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या मुद्द्यांकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी तीन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याचेही तिरुमूर्ती यांनी सांगितले.

    India warns world regarding vaccine distribution

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या