सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे.
विशेष प्रतिनिधी
लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आपल्याच देशाच्या सरकारवर निशाणा साधत आपला देश जगाकडे पैशाची भीक मागत आहे, तर शेजारी भारत देश चंद्रावर पोहोचला आहे, असे म्हटले आहे. India has reached the moon and we are begging the world for money Nawaz Sharif told the government of Pakistan
किंबहुना, दिल्लीत यशस्वीपणे पार पडलेली G-20 शिखर परिषद आणि ऐतिहासिक चांद्रयान-3 मोहिमेच्या यशामुळे नवाझ शरीफ यांचे दु:ख अधिकच तीव्रतने बाहेर पडल्याचे दिसत आहे. त्यांनी आपल्याच देशाच्या विद्यमान सरकारवर तसेच माजी लष्करप्रमुखांवर निशाणा साधला. कारण, सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे.
त्यामुळे नवाझ शरीफ यांनी माजी लष्करी जनरल आणि न्यायाधीशांवर ही टिप्पणी केली आहे. लंडनमध्ये राहणारे पाकिस्तानचे ७३ वर्षीय माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी देशाच्या आर्थिक संकटावर आपले मत व्यक्त केले.
ते म्हणाले की, पाकिस्तानच्या आर्थिक संकटाला देशाचे माजी जनरल आणि न्यायाधीश जबाबदार आहेत.भारताने जे साध्य केले ते पाकिस्तानला का जमले नाही? नवाझ शरीफ यांनी लंडनहून लाहोरमध्ये त्यांच्या ‘पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज’ या पक्षाला संबोधित करताना या गोष्टी सांगितल्या.
India has reached the moon and we are begging the world for money Nawaz Sharif told the government of Pakistan
महत्वाच्या बातम्या
- एकीकडे भारताची आगेकूच; दुसरीकडे चीन आणि काँग्रेस यांची पीछेहाट; नेमके साम्य काय??
- आज ‘हे’ नेते सभागृहाला संबोधित करतील, विधेयकावर होणार सात तास चर्चा आणि मग…
- पाकिस्तानची मिस युनिव्हर्स एरिकाची ISI करणार चौकशी; काळजीवाहू PM म्हणाले- सौंदर्य स्पर्धा बाद; धार्मिक नेत्यांचाही विरोध
- हायकोर्टाचे निर्देश- सरकारने सोशल मीडिया वापराचे वय ठरवावे; मुलांना याचे व्यसन, इंटरनेटवरून मेंदू भ्रष्ट करणाऱ्या गोष्टी काढून टाका