• Download App
    हवामान बदलाच्या नुकसानीवर मात करण्यात भारत – पाक अकार्यक्षम, अमेरिकेच्या गुप्ततर यंत्रणेचा दावा |India cant curb on global warming says USA

    हवामान बदलाच्या नुकसानीवर मात करण्यात भारत – पाक अकार्यक्षम, अमेरिकेच्या गुप्ततर यंत्रणेचा दावा

    विशेष प्रतिनिधी

    न्यूयॉर्क – भारतातील अनेक भागात सध्या अतिवृष्टी, पूर यामुळे मोठी हानी झाली आहे. हवामान बदलामुळे होणाऱ्या पर्यावरणीय आणि सामाजिक समस्यांवर मार्ग काढण्याची क्षमता नसलेल्या देशांमध्ये भारत व पाकिस्तानचा समावेश असल्याचे अमेरिकी गुप्तचर यंत्रणांच्या अहवालात म्हटले आहे.India cant curb on global warming says USA

    पर्यावरण आणि सामाजिक संकटांवर मात करण्याच्या क्षमतेचा विचार करता ११ देश अत्यंत संवेदनशील असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यात भारत, पाकिस्तानसह अफगाणिस्तान, म्यानमार, इराक, उत्तर कोरिया, ग्वाटेमाला, हैती, होंडुरास, निकारागुआ आणि कोलंबिया या देशांचा समावेश आहे.



    उष्णता, दुष्काळ, पाण्याची उपलब्धता आणि अकार्यक्षम सरकार अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी पायाभूत सुविधा व यंत्रणेच्या कमतरतेमुळे या देशांचा समावेश अत्यंत असुरक्षित गटात करण्यात आला आहे.

    अहवालात अफगाणिस्तानचा विशेष उल्लेख केला आहे. तीव्र उष्णता, दुष्काळ, पाणीटंचाई हे तेथील मुख्य चिंतेचे विषय आहेत. याशिवाय भारत व पश्चि,म आशियायी देशांमधील काही भागात पाण्यावरून वाद हाही भौगोलिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मुद्दा आहे.

    India cant curb on global warming says USA

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या