वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतात सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसी दिल्या जात आहेत. आता भारतीय औषध नियामकांकडून रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीच्या आपत्कालीन वापराला भारतात मंजुरी दिली आहे. India approves emergency use of Russia’s anti-coronary Sputnik vaccine
डॉ. रेड्डीज लेबोरेटरीज या लसीची निर्मिती आणि वितरण करणार आहे. नागरिकांना लसीचे दोन डोस घ्यावे लागतील. पहिला डोस घेतल्यानंतर 21 दिवसांनी दुसरा घ्यावा लागेल. लस घेतल्यानंतर 28 आणि 42 दिवसांमध्ये शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होईल. त्यामुळे लसीचे दोन डोस घेणं आवश्यक असणार आहे.
आता तीन लसी मिळणार
डॉ. रेड्डीजने स्पुटनिक-5 लस भारतामध्ये आणण्यासाठी ‘रशिया डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड’ यांच्यासोबत करार केला आहे. भारतात सध्या सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सीन लस दिली जात आहे. आता या दोन लसींसोबत आणखी एका लसीला मान्यता मिळाल्यास लसीकरणाला अधिक वेग येणार आहे.
अन्य लसीही येत आहेत
भारतात सध्या स्थानिक सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सीनचे लसीकारण सुरु आहे. यानंतर आता स्पुटनिक व्ही (डॉ. रेड्डी यांच्या सहकार्याने) या लसीला आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाली आहे.
तर जॉनसन आणि जॉनसन सहकार्याने बायोलॉजिकल ई, नोवॅवॅक्स लस (सीरम इन्स्टिट्यूट इंडियाच्या सहकार्याने तसे झाइडस कॅडिलाची लस आणि भारत बायोटेकची इंट्रानेसल या लसींना देखील परवानगी मिळू शकते.
दोन महिने टाळा दारूचे सेवन
‘स्पुटनिक व्ही’ चे लसीकरण सुरु झाल्यानंतर रशिया सरकारने आपल्या नागरिकांना दोन महिने दारुचे सेवन करू नये, असा सल्ला दिला. लसीकरणात रशियाने जगात बाजी मारली आहे.
रशियात आरोग्यकर्मी, सैनिक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना लस देण्यास सुरुवात झालीय. लस घेतल्यानंतर दारुचे सेवन केले नाही तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते.