• Download App
    पाकिस्तानच्या संसदेत खासदारांमध्ये हाणामारी, शिवीगाळ करत एकमेंकांना फाईली फेकून मारल्या|In the parliament of Pakistan, there were fights between the MPs, abusing each other and throwing files at each other

    पाकिस्तानच्या संसदेत खासदारांमध्ये हाणामारी, शिवीगाळ करत एकमेंकांना फाईली फेकून मारल्या

    पाकिस्तानच्या संसदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांत अक्षरश: हाणामारी झाली.  संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या नॅशनल असेंब्लीमध्ये सत्ताधारी पीटीआय आणि  विरोधी पक्षाच्या खासदारांनी एकमेकांना शिवीगाळ करत फाइली फेकून मारल्या. संसदेत हा असंसदीय प्रकार घडत असताना सभागृहात महिला खासदारही हजर होत्या. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा रक्षकांना सभागृहात बोलवावे लागले.In the parliament of Pakistan, there were fights between the MPs, abusing each other and throwing files at each other


    विशेष प्रतिनिधी

    इस्लामाबाद: पाकिस्तानच्या संसदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांत अक्षरश: हाणामारी झाली.  संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या नॅशनल असेंब्लीमध्ये सत्ताधारी पीटीआय आणि  विरोधी पक्षाच्या खासदारांनी एकमेकांना शिवीगाळ करत फाइली फेकून मारल्या.

    संसदेत हा असंसदीय प्रकार घडत असताना सभागृहात महिला खासदारही हजर होत्या. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा रक्षकांना सभागृहात बोलवावे लागले.पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’ने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार, विरोधी पक्ष पीएमएलएनचे नेते शाहबाज शरीफ सभागृहात भाषण करत होते.



    सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती. त्याच दरम्यान, इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते अली अवान यांनी विरोधी पक्षातील नेत्यांबद्दल अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. या दरम्यान त्यांनी एक पुस्तिकाही विरोधकांच्या दिशेने फेकली. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांकडून सुरू झालेल्या राड्यामुळे सभागृहाला युद्धभूमीचे स्वरुप आले.

    दोन्ही बाजूच्या खासदारांनी एकमेकांवर अर्थसंकल्पाच्या प्रती फेकून मारल्या. खासदारांमध्ये सुरू असलेली हाणामारी थांबवण्यासाठी सुरक्षा जवानांना बोलवण्यात आले. मात्र, त्यांनाही या खासदारांना आवर घालता आला नाही. अखेर वरिष्ठ सभागृहाच्या सुरक्षा जवानांना बोलवण्यात आले.

    त्यानंतरही  शिवीगाळ आणि एकमेकांवर फाईल्स फेकून मारण्याचे प्रकार सुरूच होते. पाकिस्तानच्या वाहिन्यांवर या सगळ्या प्रकाराचे थेट प्रक्षेपण सुरू होते. पीएमएल एन पक्षाच्या खासदार मरियम औरंगजेब यांनी या संपूर्ण घटनेसाठी पंतप्रधान इम्रान खान यांना दोषी ठरवले.

    इम्रान खान यांच्या ‘नव्या पाकिस्तान’मधील ही वास्तविकता असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्याकडून संसदेला आणि लोकशाहीला कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

    In the parliament of Pakistan, there were fights between the MPs, abusing each other and throwing files at each other

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या