वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानात लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्या निवृत्तीनंतर पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी लष्कर प्रमुख पदी जनरल सय्यद असीम मुनीर यांची, तर संयुक्त सेनादल प्रमुख पदी जनरल शाहीर शमशाद मिर्झा यांच्या नावांची घोषणा केली आहे. In Pakistan, the names of the army chief and army chief have been announced
पण पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आरिफ अल्वी यांनी त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे का?, हा प्रश्न आता उद्भवला आहे. कारण आरिफ अल्वी ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात, त्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पार्टीचे प्रमुख माजी पंतप्रधान इम्रान खान हे आहेत. आरिफ अल्वी हे आपल्याशी चर्चा करून पाकिस्तानी राज्यघटनेनुसारच लष्कर प्रमुख नियुक्तीचा निर्णय घेतील, असे इम्रान खान यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे अर्थातच विद्यमान पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी केलेल्या नावांची शिफारस राष्ट्राध्यक्ष आरिफ अल्वी स्वीकारणार नाहीत, अशी पाकिस्तानी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर प्रमुखाच्या नियुक्तीचा वाद राजकीय कारणांमुळे चिघळणार असल्याची चिन्हे आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहा व शरीफ यांनी लेफ्टनंट जनरल साहीर शमशाद मिर्झा यांना जॉईंट चीफ ऑफ स्टाफ, तर लेफ्टनंट जनरल सैयद असीम मुनीर यांना लष्कर प्रमुख पदी नेमण्याचा निर्णय घेतला आहे असे ट्विट पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्री मरियम औरंगजेब यांनी केले आहे. त्यामुळे जनरल मिर्झा आणि जनरल मुनीर यांचे नियुक्ती झाल्याच्या बातम्या देण्यात आल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात राष्ट्राध्यक्ष आरिफ अल्वी यांची मंजुरी मिळाल्याशिवाय त्यांची नियुक्ती प्रत्यक्षात येणार नाही आणि इम्रान खान यांच्या वक्तव्यामुळे या नियुक्तीतच अडथळे उत्पन्न होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी देखील पाकिस्तानातील लष्कर प्रमुखाची नियुक्ती ही इम्रान खान यांची परीक्षा असल्याचे ट्विट करून त्यांना टोचले आहे. इम्रान खान हे लष्कर प्रमुखाचे नियुक्ती सहज होऊ देतात की त्यामध्ये राजकारण आणतात, यावर त्यांची पाकिस्तानी देशभक्ती उघड होणार आहे, असे खोचक ट्विट ख्वाजा असीफ यांनी केले आहे.
In Pakistan, the names of the army chief and army chief have been announced
महत्वाच्या बातम्या
- काश्मीरमध्ये पंपूर मधल्या शिव मंदिराचा होणार जीर्णोद्धार; अतिक्रमण हटवण्याचे महापौर याकूब मलिकांचे निर्देश
- ठाकरे – आंबेडकर – पवार एकत्र येण्याच्या नुसत्याच चर्चा, पण दलित पॅंथरचा एकनाथ शिंदेंना खुला पाठिंबा
- ठाकरे गटाच्या व्यासपीठावरून बिस्मिल्ला ए रहमान ए रहीम म्हणत सुषमा अंधारेंनी समजावले इस्लामचे 5 फर्ज!