पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात कुराणाचा अपमान केल्याच्या आरोपाखाली एका मध्यमवयीन व्यक्तीची हत्या करण्यात आली. हे प्रकरण प्रांतातील एका दुर्गम गावातील असल्याचे सांगितले जात आहे. रविवारी या प्रकरणाची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, जंगल डेरा गावात शनिवारी ही घटना घडली, जेथे स्थानिक लोक मगरीब (संध्याकाळच्या) नमाजानंतर जमले होते. In Pakistan a young man was accused of insulting the Koran and beaten to death by a mob
वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात कुराणाचा अपमान केल्याच्या आरोपाखाली एका मध्यमवयीन व्यक्तीची हत्या करण्यात आली. हे प्रकरण प्रांतातील एका दुर्गम गावातील असल्याचे सांगितले जात आहे. रविवारी या प्रकरणाची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, जंगल डेरा गावात शनिवारी ही घटना घडली, जेथे स्थानिक लोक मगरीब (संध्याकाळच्या) नमाजानंतर जमले होते.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, घटना घडण्यापूर्वीच पोलीस गावात पोहोचले होते, मात्र जमावाने मध्यमवयीन व्यक्तीला एसएचओच्या ताब्यातून सोडवून झाडाला बांधले. यानंतर जमावाने त्याला बेदम मारहाण केली.
घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितले की, तरुणाने आपल्यावरील आरोप फेटाळले होते. त्याने आपल्या निर्दोषतेचा पुरावा सादर करण्याचा दावाही केला होता, परंतु संतप्त जमावाने त्याच्या युक्तिवादाकडे दुर्लक्ष केले आणि त्याला झाडाला बांधून बेदम मारहाण केली.
दुसरीकडे, पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बुझदार यांनी पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागवला असून, या घटनेच्या सविस्तर चौकशीचे आदेशही दिले आहेत.
पाकिस्तानमध्ये इस्लामची बदनामी करण्याविरुद्ध खूप कठोर कायदे आहेत, ज्यात फाशीची शिक्षा आहे. तत्पूर्वी, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात कट्टरपंथी इस्लामी पक्षाच्या संतप्त समर्थकांनी दोन महिन्यांपूर्वी ईशनिंदा केल्याच्या आरोपावरून एका कपड्याच्या कारखान्यातील कामगाराची हत्या केली होती. यानंतर त्याच्या मृतदेहाला आग लावण्यात आली. मृत व्यक्ती श्रीलंकेचा रहिवासी होती.
In Pakistan a young man was accused of insulting the Koran and beaten to death by a mob
महत्त्वाच्या बातम्या
- #CaptainModi4Punjab : सुपर संडे प्रचारात पंजाब मध्ये जोरदार ट्रेंड!!
- सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री : सरकारने धरली माघारीची वाट; अण्णांनीही सोडला उपोषणाचा आग्रह!!
- शिवजयंती मिरवणुकीस परवानगी देण्याची मागणी
- आदित्य ठाकरेंना देशव्यापी नेतृत्व करायला पाठवून महाराष्ट्रात कोणाचा मार्ग मोकळा करून घ्यायचा आहे??