वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे शेवटच्या चेंडूपर्यंत राजकीय सामना ताणून धरत आज नॅशनल असेंब्लीत अखेरचा बाउन्सर टाकला. आपल्या सरकार विरुद्ध विरोधी पक्षांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव मतदान घेण्याचे टाळून उपसभापतीं कडूनच नॅशनल असेंब्लीत खारीज करून घेतला. त्यानंतर लगेच पुढचा बाउन्सर टाकत नॅशनल असेंब्ली बरखास्तीची शिफारस केली आणि पाकिस्तानी जनतेला निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आवाहन पाकिस्तान टीव्हीवरून करून टाकले.Imran’s dismissal of National Assembly in Pakistan
आपण हार मानणार नाही. पाकिस्तान सरकारचा राजकीय सामना शेवटच्या चेंडू पर्यंत खेळवत राहू, असे इम्रान खान यांनी आधीच सांगितले होते. त्या प्रमाणे त्यांनी पाकिस्तान नॅशनल असेंब्लीत अविश्वास प्रस्ताव येऊ दिला पण त्यावर मतदान घेण्यापूर्वीच तो उपसभापतींकडून फेटाळून घेतला. बाहेरच्या शक्ती पाकिस्तानचे सरकार पाडण्याचे कारस्थान करत असल्याचा आरोप करून उपसभापतींनी अविश्वास ठराव आपल्या अधिकारात फेटाळला.
त्यानंतर लगेच इम्रान खान यांनी पाकिस्तानचे अध्यक्षांकडे नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्याची शिफारस करून पुढची खेळी केली. पाकिस्तानचे अध्यक्ष लगेच पंतप्रधान इम्रान खान यांची शिफारस स्वीकारून नॅशनल असेंब्ली बरखास्तीच्या कामाला लागले आहेत. त्यामुळे पाकिस्तानात मुदतपूर्व निवडणूक घ्यावी लागणार आहे.
Imran’s dismissal of National Assembly in Pakistan
महत्त्वाच्या बातम्या
- Raj Thackeray : मराठी म्हण उलटी फिरली…!!; “एक लोहार की नंतर सौ सोनार की” झाली…!!
- Raj Thackeray : भाजपचा भोंगा, लेक्चरबाजी, सरडा, अक्कलदाढ या शब्दांच्या भडिमाराने राज ठाकरेंना राष्ट्रवादी – शिवसेनेतून प्रत्युत्तर!!
- UPA Chairman : शरद पवार कोल्हापूरात म्हणाले, यूपीए अध्यक्षपदात रस नाही…!!, पण करणार आहे कोण…??