विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद – काश्मी्रच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचे आहे की स्वतंत्र राज्य हवे, याचा निर्णय त्यांनीच घ्यावा, असे पाकिस्तानचे धोरण असल्याचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.
पाकव्याप्त काश्मी्रमध्ये रविवारी निवडणूक होणार आहे.Imran targets India once again
त्यासाठी प्रचारसभेत बोलताना इम्रान यांनी काश्मीयरला पाकिस्तानचा वेगळा प्रांत घोषित करण्याची तयारी त्यांचे सरकार करीत आहे, हा दावाही फेटाळला. पाकव्याप्त काश्मीतरला वेगळ्या राज्याचा दर्जा देण्याची योजना इम्रान खान यांच्या सरकारची असल्याचा आरोप विरोधी पक्ष करीत आहेत.
‘‘एक दिवस असा येईल की संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) प्रस्तावानुसार भविष्याचा निर्णय घेण्याची परवानगी काश्मीसरी जनतेला मिळेल आणि त्यादिवशी काश्मीिरमधील लोक पाकिस्तानबरोबर येण्याचा निर्णय घेतील.
‘यूएन’च्या जनमत चाचणीनंतर आमचे सरकारही जनमतचा कानोसा घेईल. त्यानंतर पाकिस्तानबरोबर यायचे की स्वतंत्र राज्य हवे, असा पर्याय त्यांच्यापुढे असेल,’’ असे इम्रान खान म्हणाले.
Imran targets India once again
महत्त्वाच्या बातम्या
- चीनमध्ये महापुराचे थैमान सुरूच, ३० लाखाहून अधिक नागरिकांना पुराचा फटका
- चीनची लसदेखील प्रभावी नसल्याचा दावा, जनतेच्या आरोग्याबाबत प्रश्ननचिन्ह
- उत्तर कोरियाच्या नागरिकांना अन्नधान्याची मोठी टंचाई, अमेरिकेपुढे झुकण्यास किम जोंग उन यांचा नकार
- अरुणाचलच्या सीमेवर जिनपिंग यांची भेट, भारत-चीन सीमेवरील गावाला भेट देणारे पहिलेच चिनी अध्यक्ष